पिंपरी, ता. १० : पिंपरी चिंचवड अप्पर तहसीलला हक्काची जागा अजूनही मिळालेली नाही. ती मिळावी, यासाठी गेल्या दोन वर्षांपासून पत्रव्यवहार सुरू आहे. यापूर्वीचा प्रस्ताव नामंजूर झाल्याने आता पुन्हा एक हेक्टर जागेसाठी नव्याने व अद्ययावत प्रस्ताव तहसील कार्यालयाने जुलैमध्ये पाठवला आहे. त्यावर शासनाकडून कार्यवाहीची प्रतीक्षा आहे.
सध्या निगडी येथील ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाशेजारी या कार्यालयाचे कामकाज सुरू आहे. त्यामुळे अपुरी जागा व मर्यादित सुविधांमध्ये काम करावे लागत आहे. त्यातच नागरीकरण व कामाचे ताण वाढत आहे. भाडेतत्त्वावर असलेल्या इमारतीमध्ये पार्किंग, नागरिकांसाठी बैठकव्यवस्था, स्वच्छतागृह या सुविधा मिळत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. शहरांतर्गत ३१ तलाठी सज्जे आहेत. त्या अंतर्गत विविध दाखले, प्रमाणपत्रे, मंजुरी या कामासाठी हेलपाटे मारतात. त्याचप्रमाणे महसूलविषयक उतारे, फेरफार नोेंदणी, वारस नोंद, सुनावणी, मोजणी यासोबतच विविध प्रकाराचे अर्जावर प्रक्रिया करावी लागते. अपुरी जागा, अपुरे कर्मचारी यामुळे ही कामे होत नसल्याने अर्जदारांचा खोळंबा होत आहे.
या कार्यालयासाठी चिखली येथील सर्व्हे नंबर ५३९ मध्ये १ हेक्टर जागेची मागणी केली आहे. यापूर्वी २ हेक्टर जागेसंदर्भात धोरणाला अनुसरून नसल्याचे कारण दाखवत प्रस्ताव नाकारला होता. आता पुन्हा शासकीय कार्यालय, निवासस्थान यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
चिखलीतील तहसील कार्यालयासाठी जागा मिळावा, यासाठी पाठपुरावा सुरू आहे. त्यासाठी पुनर्प्रस्ताव देखील सादर केला आहे. लवकरच जागा मिळेल, अशी अपेक्षा आहे.
- जयराज देशमुख, अप्पर तहसीलदार, पिंपरी चिंचवड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.