पुणे

बनावट प्रमाणपत्राद्वारे ‘पीएमआरडीए’ची फसवणूक

CD

पिंपरी, ता. २० : रस्ते कामांच्या निविदा मिळविण्यासाठी बनावट कार्यपूर्ण प्रमाणपत्रे सादर केल्याप्रकरणी बांधकाम कंपनीच्या संचालकावर निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑनलाइन निविदा प्रक्रियेदरम्यान हा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.

या प्रकरणी ‘पीएमआरडीए’चे उपअभियंता ज्ञानोबा चौरे (रा. हडपसर) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मे. एसपीडी इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडचा संचालक शहाजी पांडुरंग देवकर याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘तळेगाव ढमढेरे व सणसवाडी परिसरातील दोन रस्त्यांच्या रुंदीकरण व काँक्रिटीकरणाच्या कामासाठी निविदा काढण्यात आल्या होत्या. त्या मिळविण्यासाठी आरोपीने कुळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या सही-शिक्क्याच्या तीन मूळ प्रमाणपत्रांमधील रकमेत फेरफार केला. ही बनावट प्रमाणपत्रे खरी असल्याचे भासवून ती ऑनलाइन प्रक्रियेत सादर केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mehbooba Mufti: जम्मू काश्मीर भरताचाच अविभाज्य भाग म्हटलेल्या अमेरिकेच्या राजदूतांवर महबूबा मुफ्ती नाराज, स्पष्ट शब्दांत म्हणाल्या...

Mumbai News: कांजूरमार्गात धावत्या लोकलच्या छतावर चढला तरुण; OHE वीजपुरवठा बंद, रेल्वे सेवा विस्कळीत

Pune Civic Warning: पुण्यात खड्ड्यांचे साम्राज्य; आठ दिवसांत खड्डे बुजवा, नाहीतर रस्त्यावर उतरून आंदोलनाचा स्थायी समिती अध्यक्षांचा इशारा

Kondhwa Anti-Drug Action: कोंढव्यात अंमली पदार्थविरोधी मोठी कारवाई; गांजा खरेदीसाठी आलेले ६१ जण ताब्यात, दोन सराईत विक्रेते अटकेत

Pune Noise Control: डीजे मुक्त गणेशोत्सवासाठी पुणे पोलिसांचा साऊंड तपासणी उपक्रम; कर्णकर्कश ध्वनी रोखण्यासाठी सर्वपक्षीय बैठक

SCROLL FOR NEXT