पुणे

जुन्या भांडणाच्या कारणावरून जीवे मारण्याचा प्रयत्न

CD

पिंपरी : जुन्या भांडणाच्या कारणावरून धारदार शस्त्राने वार करून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना दापोडीतील सीएमई गेटसमोर घडली. या प्रकरणी विलास बबन हजारे (रा. पवनानगर, पिंपळे गुरव) यांनी दापोडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विजय चिंतामण शिंदे (रा. दापोडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपीने फिर्यादीवर धारदार शस्त्राने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, फिर्यादीच्या मित्राने त्यास अडविण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्यालाही धक्का मारून बाजूला केले. त्यानंतर हत्यार भिरकावून परिसरात दहशत निर्माण केली.

सोनसाखळी हिसकावली
पिंपरी : एका मुलीच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकाविल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना काळेवाडी फाटा येथे घडली. गोरख दशरथ सुखळे (रा. भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी थेरगाव येथील तीस वर्षीय महिलेने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी या कुटुंबासह गणपती खरेदीसाठी गेल्या होत्या. दरम्यान, आरोपीने फिर्यादीच्या मुलीच्या गळ्यातील ७० हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावली.

पोलिस ठाण्यासमोर गोंधळ; पाच जणांवर गुन्हा
पिंपरी : पोलिस ठाण्यासमोर आपापसात मोठ्याने शिवीगाळ करून हाताने मारहाण करीत सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार काळेवाडी पोलिस ठाण्यासमोर घडला. राजू आल्हाट, लक्ष्मण आल्हाट, योगेश मंडलिक, दिनेश वळू, पंकज आल्हाट अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पत्नी, मुलाकडून मारहाण
पिंपरी : एकाला त्याच्या पत्नी व मुलाने बेदम मारहाण केल्याची घटना सुसगाव येथे घडली. या प्रकरणी रामनाथ ज्ञानदेव कासार (रा. निकाळजे वस्ती, सुसगाव) यांनी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रथमेश रामनाथ कासार व एक महिला यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी यांनी त्यांचा मुलगा प्रथमेश याला गणपतीच्या सजावटीचे सामान रस्त्यात का ठेवले, बाजूला ठेव, असे म्हटल्याचा राग आल्याने तो वडिलांना शिवीगाळ करून हाताने मारहाण करू लागला. त्यावेळी फिर्यादी वडील मोबाईलमध्ये व्हिडीओ काढत असताना मुलाने मोबाईल हिसकावला. त्यानंतर फिर्यादी हे मुलाच्या हातातील मोबाईल घेत असताना त्यांच्या पत्नीने फिर्यादीस शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. मुलाने प्लॅस्टिकच्या पाईपने बेदम मारहाण केली.

भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार वृद्धाचा मृत्यू
पिंपरी : भरधाव मोटारीने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार वृद्धाचा मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी आहे. नामदेव विठ्ठल बोडके (रा. गहुंजे) असे या अपघातात मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. या प्रकरणी नितीन नामदेव बोडके यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रजत किशोर सोलंकी (रा. वडगाव मावळ) याला अटक केली आहे. नामदेव बोडके हे दुचाकीवरून जुन्या पुणे-मुंबई महामार्गाने जात असताना शेलारवाडी फाटा येथे आरोपीने त्याच्या ताब्यातील भरधाव मोटारीने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यात गंभीर जखमी झाल्याने नामदेव बोडके यांचा मृत्यू झाला. तसेच वसंत जोशी यांना धडक दिल्याने तेही जखमी झाले.

मेफेड्रोनप्रकरणी तिघांवर गुन्हा
पिंपरी : विक्रीसाठी बेकायदारित्या मेफेड्रोन (एमडी) हा अमली पदार्थ जवळ बाळगणाऱ्या तिघांवर संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई मोरवाडीतील लालटोपीनगर येथे गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने केली. तानाजी कानुरे (रा. रुपीनगर, तळवडे), मयूर पाडाळे (रा. ताम्हाणे वस्ती, चिखली) व एक महिला अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. तानाजी व महिला आरोपीकडून पोलिसांनी आठ ग्रॅम ७८० मिली ग्रॅम एमडी हा अमली पदार्थ, तीन मोबाईल, एक मोटार असा एकूण पाच लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. हा अमली पदार्थ कोठून आणला याबाबत चौकशी केली असता मयूर पाडाळे यांच्याकडून आणल्याचे सांगितले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

Pakistan Cricket : पाकिस्तानात शाहिद आफ्रिदीच्या नावावरून पसरलीय अफवा; नेमकं काय घडलं?

कोकणात मध्यरात्री बाप्पाची ‘चोरी’ होते? दारात गणपती ठेवून फटाके फोडण्यामागचं कारण ऐकून व्हाल भावूक!

SCROLL FOR NEXT