पुणे

गोविंदा रे गोपाळा, यशोदेच्या तान्ह्या बाळा...

CD

पिंपरी, ता. ५ : गोविंदांच्या मानवी मनोऱ्यांचा थरार, मराठी-हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांची हजेरी, ढोल-ताशांचा गजर, गाण्यांचा आवाज आणि तरुणाईचा अथांग उत्साह...अशा वातावरणात दहीहंडी उत्सवाला मोठी रंगत आली. संपूर्ण शहरात ‘गोविंदा रे गोपाळा’चा गजर ऐकायला मिळाला. सात थरापर्यंतचे मानवी मनोरे रचण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चुरस पाहायला मिळाली. आयोजकांकडूनही गोविंदांसाठी लाखोंच्या बक्षिसांची लयलूट करण्यात आली.
पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, प्राधिकरण, वाकड, भोसरीसह शहरातील विविध ठिकाणी राजकीय पक्ष आणि संघटनांकडून दहीहंडी उत्सव आयोजन केले. उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले ते मानाच्या दहीहंड्यांसमोर रचले जाणारे मानवी मनोरे. दुपारपासूनच गोविंदा पथके मानाच्या हंड्या फोडण्यासाठी रस्त्यावर उतरले. ‘गोविंदा रे गोपाळा’च्या जयघोषात आणि पारंपरिक ढोल-ताशा पथकांच्या उडत्या तालावर गोविंदांनी पाच, सहा आणि सात थरांचे उत्कृष्ट मानवी मनोरे उभे केले. बालगोपाळांपासून ते व्यावसायिक पथकांनी त्यात सहभाग घेतला.

काही सेकंदांत सलामी
व्यावसायिक गोविंदा पथकांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आणि सुरक्षिततेची काळजी घेत अवघ्या काही सेकंदांत हंडी गाठून सलामी दिली. त्याला नागरिकांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून दाद दिली. उंच टांगलेल्या हंड्या, सभोवताली लागलेली विद्युत रोषणाई आणि ध्वनिक्षेपकांवरील गोविंदाची गाणी यामुळे वातावरणात एक वेगळीच उर्जा भरली. महिला भगिनींनीही या उत्सवाचा आनंद घेण्यासाठी रस्त्यांवर आणि गॅलऱ्यांमध्ये मोठी गर्दी केली. अनेक ठिकाणी रात्री उशिरापर्यंत मानाच्या आणि मोठ्या बक्षिसांच्या हंड्या फोडण्यात आल्या.

बक्षिसांसाठी चढाओढ
उत्साही वातावरणात गोविंदा पथक थर लावण्यासाठी सज्ज झाले. गोविंदा पथक थरावर थर लावत होते. बक्षीस मिळवण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चढाओढ पाहण्यास मिळाली. गोविंदा पथकांच्या सलामीला थरानुसार दहा हजारांपासून ते दोन लाखांपर्यंत बक्षिसांची रक्कम देण्यात आली. तर दहीहंडी फोडणाऱ्या पथकांसाठी एक लाखापासून ते आठ लाख रुपयांपर्यंतच्या बक्षीसांचे वाटप करण्यात आले.

पिंपरीत साडेसात लाखांचे बक्षिस
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या उत्साहाला आणखी रंगत आणण्यासाठी पिंपरीगावात नगरसेवक व स्थायी समिती सदस्य संदीप वाघेरे यांनी भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले. दहीहंडी उत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणून योद्धा फेम अभिनेत्री राशी खन्ना, ‘मुसाफिर कॅफे’ फेम महिमा मकवाना, ‘रौंदळ’ फेम नेहा सोनवणे आणि ‘बिग बॉस मराठी सीझन ६’ फेम रुचिता जामदार यांनी विशेष उपस्थिती लावली. त्यामुळे यंदाचे दहीहंडी उत्सव विशेष आकर्षणाचे केंद्रे ठरली. पिंपरीगावात यंदाच्या दहीहंडी स्पर्धेसाठी आयोजकांकडून तब्बल ७ लाख ७७ हजार ७७७ रुपयांची आकर्षक बक्षिसे जाहीर करण्यात आली.

‘ग्लॅमर’चा तडका !
उत्सवाचे मुख्य आकर्षण वाढवण्यासाठी अनेक दहीहंडी आयोजकांनी प्रसिद्ध सिनेअभिनेते, अभिनेत्री आणि नामांकित खेळाडूंना आमंत्रित केले. त्यामुळे उत्सवाला ‘ग्लॅमरस टच’ आला. त्यांच्या एका झलकेसाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. भोसरीतील श्री भैरवनाथ दहीहंडी उत्सवात भारतीय टी २० क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी उपस्थिती लावली. राम वाकडकर युथ सोशल फाउंडेशन आयोजित फिनिक्स मॉल ऑफ द मिलिनियम, भारत माता चौक, वाकड येथे भव्य दहिहंडी उत्सवात सिनेअभिनेत्री निधी अग्रवाल, गिरीजा प्रभू आणि प्रमाद खांडेकर, नम्रता संभेराव यांनी रंगत वाढवली. क्रांतिवीर चापेकर चौक, चिंचवडगाव येथे अखिल चिंचवडगांव सार्वजनिक दहीहंडी उत्सव समिती आयोजित दहीहंडी महोत्सवात सिने अभिनेत्री क्रांती रेडकर विशेष आकर्षण होती. शिवोदय पथकाचे दमदार वादन केले. मोहनगरच्या श्री दत्त मंदिर चौक परिसरात राजमुद्रा प्रतिष्ठान आयोजित भव्य दहीहंडी उत्सवात मराठी अभिनेत्री जुई गडकरी उपस्थिती लावली. संदेश होळकर, अरूण हस्तोडिया, बापू कातळे आणि नगरसेविका रेश्‍मा कातळे मित्र परिवार यांच्यावतीने आयोजित दहीहंडी उत्सवात मराठी अभिनेत्री पौर्णिमा डे हिने उपस्थिती लावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG : टीम इंडिया अफगाणिस्तानला घाबरलीय! माजी खेळाडूची निवड समितीवर टीका; म्हणाले, हताश होऊन उचललेले पाऊल...

Subhash Chandra: सुभाष चंद्रा यांच्यावर सीबीआयकडून फसवणुकीचा गुन्हा; 'एलआयसी'च्या तक्रारीवरुन मोठी कारवाई

Pakistan Chief of Defence Forces : पाकिस्तानची नवी खेळी; लष्करी व्यवस्थेत ऐतिहासिक सत्ताबदल, असीम मुनीर बनले ‘चीफ ऑफ डिफेन्स'

Marathi News Live Updates: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात रितेश हांगे नावाच्या तरुणाला अटक

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना बाप्पा पावणार! गणेशोत्सवात महिलांना मिळणार ३,०००? योजनेबाबत नवी अपडेट समोर

SCROLL FOR NEXT