पुणे

विजेचा धक्का लागून गायीचा मृत्यू; अपघाताला महावितरण कंपनीच दोषी

CD

पिंपरी, ता. ३ : पिंपरीगाव येथे विजेचा धक्का लागून गायीचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात महावितरणला जबाबदार धरण्यात आले आहे. पिंपरीगावातील कीर्ती हॉस्पिटलशेजारील महावितरणच्या ‘मिनी फीडर पिलर’ची योग्य देखभाल न झाल्यामुळे हा प्राणांतिक अपघात घडल्याचे विद्युत निरीक्षकांच्या तपासणीत स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी विद्युत निरीक्षक प्र. व. माने यांनी महावितरणला नोटीस बजावली असून, महावितरण कंपनीला जबाबदार धरण्यात आले आहे.

पावसामुळे धातूच्या कॅबिनेटमध्ये उतरला वीजप्रवाह
पिंपरीगाव परिसरात ७ जुलैला मुसळधार पाऊस झाला होता. कीर्ती हॉस्पिटलशेजारील फीडर पिलरच्या पायथ्याशी उंदीर व भटक्या जनावरांनी माती उकरली होती. त्यामुळे पिलरमधील ‘बी फेज’ आणि ‘न्यूट्रल बसबार’वर मोठ्या प्रमाणात माती जमा झाली होती. पावसामुळे ही माती भिजली. परिणामी फीडर पिलरच्या धातूच्या कॅबिनेटमध्ये वीजप्रवाह उतरला. याचवेळी संपर्क आल्याने गायीला विजेचा तीव्र धक्का बसला आणि तिचा जागीच मृत्यू झाला.

तपासणीत देखभालीचा अभाव उघड
या घटनेनंतर पशुपालक तथा तक्रारदार सुहास कुदळे यांनी विद्युत सुरक्षा अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पुणे येथील विद्युत निरीक्षकांकडून या घटनेची तपासणी करण्यात आली. तपास अहवालात फीडर पिलरची योग्य देखभाल न ठेवल्यामुळेच हा अपघात घडल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या दुर्घटनेच्या नुकसानीस महावितरणला जबाबदार धरण्यात आले आहे. नुकसानभरपाईची पूर्तता करून त्याबाबतचा अहवाल विद्युत निरीक्षक कार्यालयास सादर करण्याचे निर्देश संबंधित नोटिशीद्वारे महावितरणला देण्यात आले आहेत.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: नागपुरात डीजे ‘सायलेंट’! ३ नोव्हेंबरपर्यंतचे आदेश; दहीहांडी, पोळा, गणेशोत्सव, नवरात्र आणि धम्मचक्रप्रवर्तन दिनीही राहणार बंद

Pune Traffic Update : पुण्याच्या वाहतुकीत मोठे बदल; ४-५ सप्टेंबरला ‘हे’ रस्ते राहणार बंद, पर्यायी मार्गांची यादी पाहा

Vidyanand Bapat Assault : विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला करणारा संतोष चव्हाण कोण? नेमकी कशामुळे केली मारहाण?

Marathi News Live Updates : विद्यानंद बापट यांना मारहाण केलेल्या आरोपीला उद्या कोर्टात हजार करणार - पुणे पोलीस आयुक्त

Mumbai Viral Video : एका बाजूला अरबी समुद्र, दुसऱ्या बाजूला विमानतळ! मुंबईतील हे ८० कोटींचं घर पाहीलंत का? सोशल मीडियावर हवा...

SCROLL FOR NEXT