पुणे

ऊर्जा बचतीसाठी कृती आराखडा

CD

पिंपरी, ता. १३ ः महापालिकेच्या इमारतींमध्ये ऊर्जा बचतीसाठी वेळबद्ध कृती आराखडा तयार करून तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे आवश्यक आहे. पर्यावरण संवर्धन, आर्थिक बचत आणि शाश्वत विकास या तिन्ही उद्दिष्टांचा समतोल साधणारी कार्यपद्धती महापालिकेने स्वीकारणे आवश्यक आहे, त्यादृष्टिने प्रयत्न करा, असा सल्ला आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अधिकाऱ्यांना दिला.
महापालिकेच्या इमारतींमध्ये ऊर्जा बचत धोरणांतर्गत विविध उपाययोजनांबाबतची बैठक बुधवारी झाली. त्यात एसी यंत्रणा, वॉटर पंप, अन्य विद्युत उपकरणांच्या वापराचे व्यवस्थापनावर चर्चा झाली. त्यात आयुक्त सूर्यवंशी बोलत होते. अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी, उपआयुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता संतोष दुर्गे आदी उपस्थित होते. एशियन डेव्हलपमेंट बँक (एडीबी), अलांयन्स् फॉर एनर्जी इफिशिएंट इकॉनॉमी (एइइइ) आणि कौन्सिल ऑन एनर्जी, एन्व्हायरोमेंट अँड वॉटर (सीइइडब्ल्यू) या संस्थांचे प्रतिनिधी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. इन्सेप्शन रिपोर्ट, महापालिकेच्या वित्तीय स्थिती व ऊर्जा खर्च विश्लेषण अहवाल, प्राथमिक आर्थिक मॉडेल व व्यवसाय आराखडा, निधी संरचना अहवाल, प्री-फिजिबिलिटी स्टडी, अंतिम आर्थिक मॉडेल आणि अंतिम प्री-फिजिबिलिटी स्टडी अहवाल या मुद्द्यांवर संगणकीय सादरीकरण आणि चर्चा झाली.

बैठकीत चर्चा
- गुंतवणुकीचे विविध पर्याय, निधी उभारणीची संरचना, अंमलबजावणी कार्यपद्धती
- ऊर्जा कार्यक्षम प्रकल्प अंमलबजावणीसाठी दीर्घकालीन शाश्वतता, आर्थिक व्यवहार्यता, प्रत्यक्ष ऊर्जा उबचतीचे मोजमाप
- ऊर्जा बचत धोरण केवळ अहवाल आणि अभ्यासापुरते मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष अंमलबजावणीवर भर

उर्चा बचत कशासाठी?
- वीज खर्चात बचत करणे
- कार्बन उत्सर्जन कमी करणे
- शाश्वत विकासाला चालना देणे

महापालिकेचे धोरण
- महापालिकेने एइइइसोबत सामंजस्य करार केला आहे. त्याअंतर्गत एडीबी आणि सीइइडब्ल्यू यांच्या संयुक्त विद्यमाने ऊर्जा कार्यक्षमतेसंदर्भातील अभ्यास आणि नियोजन प्रक्रिया सुरू आहे.
- ऊर्जा वापर विश्लेषण, ऊर्जा बचतीच्या संधींचा शोध, आर्थिक व्यवहार्यता, आवश्यक निधी संरचना याबाबत विविध टप्प्यांमध्ये काम सुरू आहे.

ऊर्जा बचत ही केवळ आर्थिक गरज नसून, पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. महापालिकेच्या इमारतींमध्ये आधुनिक ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञानाचा वापर करावा. विविध संस्थांच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पातून महापालिकेची ऊर्जा व्यवस्थापन प्रणाली अधिक सक्षम, आधुनिक आणि परिणामकारक होईल.
- डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BRA vs JPN World Cup 2026: व्हॉट अ मॅच... ब्राझीलने शेवटच्या मिनिटाला मिळवला थरारक विजय, जपानच्या लढाऊवृत्तीचे जगभरात कौतुक

NCP finance portfolio: अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादीकडे जाणार, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर जय पवारांचा दावा

Raigad Journalists Protest: पत्रकारांना जिवे मारण्याच्या धमकीप्रकरणी रायगड पत्रकार संतप्त; खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाईची मागणी

Aashadhi Wari Restrictions: आषाढी वारीत ४ ते ९ जुलैदरम्यान आळंदीत विवाह, साखरपुडा बंद; पोलिसांकडून धर्मशाळा व मंगल कार्यालयांना स्पष्ट सूचना

Pune Water Crisis : मान्सून लांबल्याने पुण्यावर पाणीटंचाईचे संकट, धरण क्षेत्रात कृत्रिम पावसाचा महापालिकेचा प्रयोग चर्चेत

SCROLL FOR NEXT