पुणे

खाद्य वस्तू चोरणारी टोळी जेरबंद

CD

पिंपरी, ता. ४ : वाकड, चिखली आणि पिंपरी परिसरातील स्टार बाजार येथून काजू, बदाम अशा महागड्या खाद्य वस्तूंची चोरी करणाऱ्या टोळीला वाकड पोलिसांनी जेरबंद केले आहे. चार महिलांसह सात जणांना अटक करून त्यांच्याकडून सात लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
रविकांत देवानंद जाकरे, ब्रिजेश सीताराम मदेशिया, ब्रिजेश बाळू यादव, सोनम बाबू शेख (सर्व रा. जोगेश्वरी ईस्ट, मुंबई), सलमा शकिल शेख (रा. भोसरी), सानिया बाबुमिया शेख आणि रूमा ब्रिजेश मदेशिया (दोघेही रा. जोगेश्वरी ईस्ट, मुंबई) कशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. वाकड येथील दत्त मंदिर रस्ता व कलाटे वस्ती येथील स्टार बाजारमधून ४२ हजार १०० रुपये किमतीचे तूप, काजू, बदाम असे साहित्य चोरून नेले. याबाबत वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता.
पोलिसांनी घटनास्थळासह परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करीत तांत्रिक विश्लेषण करून ताथवडे-वाकड परिसरातून संशयित मोटार व एक रिक्षा ताब्यात घेतली. वाहनातील आरोपींकडे कसून चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली.
आरोपींची कसून चौकशी केली असता, त्यांनी पिंपरी आणि चिखली पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील स्टार बाजारामध्येही अशाच प्रकारच्या चोऱ्या केल्याची कबुली दिली. तसेच काटे पिंपळे आणि केसनंद फाटा येथील स्टार बाजारामधूनही खाद्य पदार्थ चोरल्याचे उघडकीस आले. हे सर्व आरोपी सराईत गुन्हेगार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Volkswagen Layoffs 2026: Volkswagen मध्ये पुन्हा मोठी नोकरकपात; आणखी ५० हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, कारचे मॉडेलही निम्मे होणार; नेमकं प्रकरण काय?

Navi Mumbai: मुदतबाह्य सलाईनमुळे रुग्णाचा मृत्यू, कुटुंबीयांना १० लाखांची मदत; दोन परिचारिका निलंबित

अखेर कमळी अंतिम वार करणार! रितेश सरपोतदारचं सत्य उघड होणार? ‘कमळी’ मालिकेत उत्कंठावर्धक वळण

Marathi News Live Updates : बीड जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Krishna Janmashtami 2026: आजची गोकुळाष्टमी ठरणार खास! 15 वर्षांनंतर जुळून आलाय दुर्मिळ योग; 'या' राशींसाठी ठरणार लकी

SCROLL FOR NEXT