Inspire Awards Sakal
पुणे

पुणे : ‘इन्स्पायर’ पुरस्कारासाठी ६ उपकरणांची राष्ट्रीय पातळीवर निवड

पिंपरी चिंचवड शहरातील विज्ञान आधारित तीन उपकरणांचा समावेश

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत ‘इन्स्पायर’ अॅवॉर्डसाठी पुणे जिल्ह्यातील ६ उपकरणांची राष्ट्रीय पातळीवर निवड झाली आहे. यात पिंपरी चिंचवड शहरातील विज्ञान आधारित तीन उपकरणांचा समावेश आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाला वाव देण्यासाठी व उत्कृष्ट शास्त्रज्ञनिर्मितीसाठी अशी निवड ही पहिली पायरी समजली जाते. शहरातील तीन विद्यार्थ्यांची निवड झाली असल्याने शिक्षण विभागाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

राज्य सरकारच्या www.inspire.award.in या संकेतस्थळावर नावनोंदणी केल्यानंतर त्यातील उत्कृष्ट प्रोजेक्ट निवडले जातात. त्यांना जिल्हा स्तरावर प्रदर्शनात सादरीकरणाची संधी दिली जाते. यावर्षी राज्यातून निवडलेल्या विविध प्रोजेक्टपैकी पुणे जिल्ह्याने बाजी मारत ६ विद्यार्थ्यांच्या विज्ञान आधारित प्रकल्पांची निवड झाली. विविध जिल्ह्यातील ३३१ प्रकल्पांची राज्यस्तरीय निवड करण्यात आली होती. त्यापैकी शहरातील तीन शाळांमधील ३ विद्यार्थ्यांचे प्रकल्प इन्स्पायर अॅवॉर्डसाठी पात्र ठरले आहेत. निवड झालेल्यांमध्ये सलिना मेहबूब शेख (वर्ग १०वी ) कासारवाडी माध्यमिक महापालिका शाळा, श्रीरंग अजय वाघ (वर्ग १०वी ) ज्ञानप्रबोधिनी माध्यमिक विद्यालय निगडी, केदार श्‍यामसुंदर पवार (वर्ग १०वी) प्रज्ञानबोधिनी इंग्लिश मीडियम स्कूल, चिखली येथील हे विद्यार्थी आहेत.

असे केले सादरीकरण

निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी २०१९-२०मध्ये राज्य सरकारच्या संकेतस्थळावर नावनोंदणी केली. त्यानंतर कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांनी प्रकल्पांचा माहितीपूर्ण व्हीडीओ तयार करून ऑनलाइन सादरीकरण केले. त्याचे जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय समितीने परीक्षण केले. निरीक्षण केले. २०२०-२१मध्ये जिल्ह्यातील विविध शाळांमधील तब्बल ८८० मुलांनी विज्ञान प्रकल्प पाठवले होते. विज्ञान आधारित मॉडेल जिल्हास्तरावर सादर केल्यानंतर त्यातील उत्कृष्ट उपक्रमाची विभाग, राज्यस्तर अशा क्रमाने निवड केली जाते. या स्पर्धेसाठी खासगी मराठी किंवा इंग्लिश मीडियम शाळा नव्हे, तर महापालिकेच्या शाळेनेदेखील विद्यार्थी निवड करून योग्यता दाखवून दिली आहे. पहिला क्रमांक पुण्याचा लागला तर कोल्हापुर जिल्ह्याचा दुसरा क्रमांक आहे. त्याखालोखाल सांगली, सातारा जिल्ह्यातून प्रत्येकी ३ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

सरकारी अनुदानाचा लाभ

सहावी ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी इन्स्पायर अॅवॉर्डसाठी नामांकन करू शकतात. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना विज्ञान आधारित मॉडेल बनविण्यासाठी सरकारकडून ३ ते ५ हजार रुपये अनुदान देण्यात येते. या रकमेसाठी विद्यार्थ्याच्या बँक खात्याचा तपशील सरकारला ऑनलाइन द्यावा लागतो. खाते नसलेल्या विद्यार्थ्यांची रक्कम शाळेच्या खात्यावर जमा केली जाते.

‘‘आमच्या विद्यार्थ्याने गोठा साफ करण्याचे उपकरण सादर केले होते. विज्ञान आणि तंत्रस्नेही शिक्षकांनी केलेले मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची कल्पकता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि जिज्ञासा यामुळे शहरातील ३ विज्ञान आधारित प्रकल्पांची राष्ट्रीय स्तरीय प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.’’

-अनिरुद्ध गोसावी, विज्ञान शिक्षक ज्ञानप्रबोधिनी माध्यमिक विद्यालय

‘‘शहरातील राज्यस्तरावरील निवड झालेल्या ६ विद्यार्थ्यांची निवड राष्ट्रीय स्तरावर झाल्याचा आनंद आहे. आमच्या विद्यार्थ्याने सार्वजनिक जागी वापरात येणारी ‘रोलिंग चेअर’ तयार केली होती.’’

-अपर्णा गोवंडे, मुख्याध्यापिका प्रज्ञानबोधिनी इंग्लिश मीडियम स्कूल, चिखली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT