पुणे

‘जय कन्हैया लाल की’ने दणाणला परिसर

CD

पिंपरी, ता. ४ : शहर आणि परिसरात श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोकुळाष्टमीचा सण अत्यंत भक्तीमय आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. निगडी येथील श्री कृष्ण मंदिर आणि रावेत येथील इस्कॉन मंदिर यासह शहरातील विविध भागांत मध्यरात्री ‘श्रीकृष्ण जन्मसोहळा’ मोठ्या थाटामाटात झाला. सकाळपासूनच कृष्ण मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी दिसून आली. भाविकांनी दर्शनासाठी मंदिरात लांबच लांब रांगा लावल्या होत्या. ‘जय कन्हैया लाल की, हाथी घोड़ा पालकी’च्या गजराने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. श्रीकृष्णाच्या मूर्तीचा दूध, दही, तूप, मध आणि विविध फळांच्या रसाने महाअभिषेक केला.
शहरातील प्राधिकरण, निगडीतील राधा कृष्ण जुने मंदिर, इस्कॉन श्री श्री गौरांग धाम शाहूनगर, चिंचवड येथील हे मंदिर, काळेवाडी येथील विजयनगर परिसरातील इस्कॉन श्री श्री राधा कृष्णचंद्र मंदिर एक प्रमुख आध्यात्मिक केंद्र, इस्कॉन भक्ती सेंटर पिंपळे निलख, भोसरी येथील इंद्रायणी नगर सेक्टर दोनमध्ये श्री राधा कृष्ण मंदिर, प्राधिकरणातील द्वारकाधीश मंदिर, जुनी सांगवी भागातील श्री कृपा सोसायटीतील कृष्ण मंदिरात अखंड हरिनाम संकीर्तन आणि कीर्तनजन्माष्टमीच्या दिवशी मंदिरांमध्ये २४ तास अखंड चालणारे महाकीर्तन आणि भजन मंडळांचे कार्यक्रम आयोजित केले होते. मंदिरांमध्ये भजन-कीर्तन, नामस्मरण तसेच मध्यरात्री श्रीकृष्ण जन्मोत्सवाचे विशेष घेतला. मध्यरात्रीचा मुख्य महाअभिषेक सोहळा झाला.

विद्युत रोषणाई आणि फुलांनी सजावट
मंदिरांमध्ये भक्तीचा जागरकृष्ण जन्माच्या निमित्ताने शहरातील प्रमुख मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई आणि सुगंधी फुलांनी सजावट करण्यात आली होती. अनेक मंदिरांमध्ये सजावटीसाठी पाचशे ते सातशे किलोहून अधिक फुलांचा वापर केला होता. भगवान श्रीकृष्ण जन्माच्या वेळी मध्यरात्री आरती, हरिनाम संकीर्तन आणि आनंदोत्सव साजरा करण्यात आला. रात्री मंदिरांवर केली जाणारी आकर्षक विद्युत रोषणाई पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी केली होती.

लहान मुलांनी राधा-कृष्णाचा पोशाख
रावेत येथील इस्कॉन श्री गोविंद धाम येथे पहाटे साडेचार वाजता मंगला आरतीने उत्सवाला सुरुवात झाली. बालगोपालाच्या मूर्तीला पंचामृताने अभिषेक घालण्यात आला. सायंकाळी कृष्णजन्म सोहळा आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. लहान मुलांनी राधा-कृष्णाचा पोशाख परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आज सकाळपासूनच इस्कॉन मंदिरात दहीहंडी फोडण्यासाठी बालगोपाळांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

अनेक मंदिरांमध्ये पाळणा सोहळा
रात्री बारा वाजता शंखनाद आणि ढोल-ताशांचा गजर आणि ‘नंद घरा आनंद भयो, जय कन्हैया लाल की, मदन गोपाल की’च्या जयघोषात बाळकृष्णाला सजविलेल्या पाळण्यात ठेवून झुलवले. निगडी आणि रावेत परिसरातील कृष्ण मंदिरांसह शहरातील इतर आध्यात्मिक केंद्रांवर भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. मंदिरांमध्ये भजन-कीर्तन, नामस्मरण तसेच मध्यरात्री श्रीकृष्ण जन्मोत्सवाचे विशेष आयोजन केले होते. यानंतर भगवंताला सुंठवडा व ५६ भोगाचा (५६ वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाया आणि अन्नपदार्थ) महाप्रसाद अर्पण केले. महाप्रसाद वाटप कृष्ण जन्मानंतर मंदिरात उपस्थित हजारो भाविकांना सुंठवडा आणि विशेष महाप्रसाद (खिचडी किंवा हलवा) वाटप केला जातो. इस्कॉन आणि मोठ्या मंदिरांमध्ये भाविकांसाठी महाप्रसादाची (अन्नदान) चोख व्यवस्था केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav : पुणे जिल्ह्यात सहा दिवस रात्री बारापर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धकास परवानगी

CM Devendra Fadnavis : बजाज फिनसर्व्हच्या मुख्यालयामुळे पुण्‍यात ४० हजार रोजगारांची संधी

Marathi News Live Updates : ''मला कॅन्सर झाला, ईडीच्या तुरुंगात असताना आजाराची सुरुवात'', संजय राऊतांचा मोठा खुलासा

CM Devendra Fadnavis : लोकसहभागानेच ‘डीजे’ चे स्तोम कमी होईल; पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा

Pune News : राज्यसेवा मुलाखतीसाटी ‘बार्टी’कडून आर्थिक सहाय्य

SCROLL FOR NEXT