पुणे

मारुंजीमध्ये प्रेमप्रकरणातून तरुणाचा खून; प्रेयसी जखमी

CD

पिंपरी/उरुळी कांचन ता. ७ : मारुंजीमध्ये एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून प्रेयसी आणि तिच्या प्रियकरावर हल्ला केला. यात प्रियकराचा मृत्यू झाला, तर प्रेयसी गंभीर जखमी झाली. गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास हा प्रकार घडला. पुणे ग्रामीणच्या उरुळी कांचन पोलिसांनी फरार आरोपीला नाकाबंदीदरम्यान शुक्रवारी जेरबंद केले.
दिनेश महादेव झांबरे (वय २३, रा. पळशी, ता. पंढरपूर, सध्या रा. मारुंजी) असे आरोपीचे नाव आहे. प्रेयसीने दुसऱ्या तरुणाशी प्रेमसंबंध ठेवल्‍याचे त्याला सहन झाले नाही. त्याने डोक्यात रॉड मारून त्या प्रियकराचा खून केला. सागर साहेबराव गायकवाड (वय २२, रा. वैष्णवी पीजी सेवन स्टार सिटी, मारुंजी, मूळ - येवला) असे मृताचे नाव आहे. २१ वर्षीय तरुणी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपी दिनेशचे जखमी तरुणीशी शालेय जीवनापासून प्रेमसंबंध होते. तरुणी बीसीएच्या शिक्षणासाठी पुण्यात आली होती. ती मारुंजीमध्ये पेइंग गेस्ट म्हणून राहत होती. तेथे व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या सागरशी तिचे प्रेमसंबंध जुळले. याचा राग आरोपीच्या मनात होता. यावरून आरोपीने हल्ला केला. शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता त्याला १२ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली.
गुन्हा केल्यानंतर आरोपी फरार होऊन मोटारीतून पंढरपूरच्या दिशेने जात होता. हिंजवडी पोलिसांनी ही माहिती तत्काळ उरुळी कांचन पोलिसांना दिली. त्यानुसार उरुळी कांचन पोलिसांनी काही मिनिटांत नाकाबंदी केली. वेगात येणारी मोटार अडवून दिनेशला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला हिंजवडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: ठाण्यात मध्यरात्री तरुणांचा जीवघेणा थरार! भरधाव कारच्या बोनेटवर बसून स्टंटबाजी, Viral Videoमुळे खळबळ

Sangli District Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीत पक्षीय राजकारण नको आमदार जयंत पाटील ; राज्यात दुष्काळ जाहीर करा

IPL 2027 News: खेळाडू की मार्गदर्शक? CSK ने MS Dhoni ची भूमिका जाहीर केली; मुख्य प्रशिक्षकपदी झहीर खान बसताच मोठी घोषणा

Marathi News Live Updates : छात्रों की गूंज' हा पुढील कार्यक्रम चेन्नईमध्ये

Konkan Railway Debt Repayment : रोहा-वीर दुहेरीकरण ते चिनाब ब्रिजची निर्मिती, कोकण रेल्वेचा 5 वर्षांत कायापालट; 23,500 कोटींचे नवीन प्रकल्प हाती

SCROLL FOR NEXT