Encroachment 
पुणे

पिंपरी पालिकेची सलग तीन दिवस मंडईत कारवाई 

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सोशल डिस्टसिंगचे उल्लंघन करणाऱ्या पिंपरी कॅम्पातील विक्रेत्यांवर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने सलग तीन दिवस कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यात अनधिकृत भाजी मंडई व भंगार दुकाने जमीनदोस्त केली. 

'लॉकडाऊन'मध्ये जीवनावश्‍यक सेवा सुरू आहेत. मात्र, खरेदी करताना सुरक्षित अंतर ठेवण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. त्याकडे दुर्लक्ष कल्याने पालिकेच्या अतिक्रमण विभागाने ही मोहिम हाती घेतली. बुधवारपासून (ता. १) त्यास सुरूवात झाली. संचारबंदी असतानाही रोज मंडईत सकाळपासूनच नागरिक मोठी गर्दी करत होते. त्यांना आवर घालणे प्रशासनाला अवघड झाले होते. परिणामी, पहिल्या दिवशी अनधिकृत थाटलेली भाजी मंडई, विविध मसाले दुकान, मच्छी मार्केटवर कारवाई केली. 

वीस वर्षांची नधिकृत मंडई हटविली 
गुरुवारी (ता. २) पिंपरी रेल्वेस्थानकाशेजारी २० वर्षांपासून थाटलेला फुल बाजार, पुजा साहित्यांची दुकाने, फळमार्केट हटविले. शुक्रवारी (ता. ४) पोलिस बंदोबस्तात बाजारपेठेतील पुलाखाली भंगाराची दुकाने, अनधिकृत टपऱ्या हटविल्या. दरम्यान, नागरिकांनी कारवाईतील भंगार जमा करण्यासाठी गर्दी केल्यामुळे पोलिसांनी त्यांना काठीचा धाक दाखविला. 

फुल विक्रेते गणेश आहेर म्हणाले, की संचारबंदीच्या नावाखाली महापालिकेने हुकूमशाही पध्दतीने अतिक्रमण कारवाई केली आहे. दुकाने बंद असताना कोणतीही सूचना न देता कारवाई केल्यामुळे अनेकांचे आर्थिक नुकसान झाले. 

आज मंडई बंद 
श्री लाल बहाद्दूर शास्त्री भाजी मंडई व्यापारी संघटनेतर्फे शनिवारी (ता. ४) मंडई बंद ठेवण्यात येणार आहे. रविवारी (ता.५) सकाळी चार ते आठ यावेळेत ती पूर्ववत असेल. 
सुनील कुदळे म्हणाले की, मंडईत सम- विषम रांगाचे विलगीकरण केले आहे. परंतु, तरीही गर्दी असल्याने हा निर्णय घेतला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Live News : अवमानना याचिकेवर सुप्रीम कोर्टाची दिल्ली पोलिसांना नोटीस

RBI Special Window: रिझर्व्ह बँकेची ‘स्पेशल विंडो;तेल कंपन्यांना होणार डॉलरचा अखंडित पुरवठा

Amravati Crime: अमरावतीत आयटी इंजिनिअरने आईला संपवलं, स्वत:च पोलिसांना जाऊन सांगितलं

IND A vs AUS A: सूर्यांश शेडगेची झुंज! भारत अ संघाने ऑस्ट्रेलियासमोर ठेवलं २७६ धावांचं लक्ष्य

Jharkhand Tribal Woman : आदिवासी महिलेला पोलिस ठाण्यात उलटे टांगले अन्... पोलिसांच्या धक्कादायक कृत्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल

SCROLL FOR NEXT