पुणे

सभा तहकुबीचा निर्णय कारभाऱ्यांच्या अंगलट

CD

पिंपरी, ता. ३० : महापालिकेची ऑगस्टची सर्वसाधारण सभा कोणतेही कामकाज न करता तब्बल महिनाभर अर्थात १७ सप्टेंबरपर्यंत महापौरांनी तहकूब केली. हा निर्णय भारतीय जनता पक्षाच्या शहर कारभाऱ्यांच्या अंगलट आला आहे. शहरासाठी महत्त्वाचे विषय असल्याचे निमित्त सांगत सप्टेंबरची सभा बुधवारी (ता. २ सप्टेंबर) घेण्याबाबतचे पत्र नगरसचिव विभागाला दिले आहे. त्याबाबतचा ठराव स्थायी समितीनेही मंजूर केला आहे. शिवाय, नियमित केवळ तीन आणि तहकूब सभेतील तब्बल १८ विषय कार्यपत्रिकेवर घेतल्याने कारभाऱ्यांच्या हेतुबाबतच संशय निर्माण होत आहे.

ऑगस्टची सर्वसाधारण सभा २० तारखेला आयोजित केली होती. यात शहरासाठी महत्त्वाचे असलेल्या ३१ विषयांसह विविध विषय समित्‍यांचे विषय सभावृत्तांत कायम करण्यासाठीचे होते. परंतु, काँग्रेस पक्षाने ‘वंदे मातरम्’चा अवमान केल्याच्या कारणावरून सभा तहकूब करण्याची मागणी भाजपच्या नगरसदस्यांनी केली. मात्र, काँग्रेसचा एकही सदस्य सभागृहात नाही. शिवाय, राज्य व केंद्रात भाजपसमवेत सत्तेत असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ३७ आणि शिवसेनेचे सहा अशा ४३ सदस्यांचा काहीही आक्षेप नव्हता. तरीही, भाजपच्याच सदस्यांनी ‘सभा होऊच द्यायची नाही,’ असा पावित्रा घेत सभागृहात गोंधळ घातला. तो पाहून पीठासीन अधिकारी तथा महापौर रवी लांडगे यांनी १७ सप्टेंबरपर्यंत तहकूब केली. त्याच दिवशी किंवा एक-दोन दिवस अगोदर सप्टेंबरची सभा होईल, असे अपेक्षित होते. मात्र, सत्ताधाऱ्यांचा गोंधळ आणि सभा लांबणीवर टाकणे, यावरून पक्षश्रेष्ठींनी पदाधिकाऱ्यांसह कोअर कमिटीचे कान टोचल्याची चर्चा रंगली. त्यामुळे स्थायी समितीने दोन सप्टेंबर रोजी सर्वसाधारण सभा घेण्याबाबतचा ठराव मंगळवारी (ता.२५) केला आणि शुक्रवारी (ता.२८) सभेची कार्यपत्रिका तयार केली. त्यात तहकूब सभेतील १८ आणि नियमित केवळ तीन विषय घेतले आहेत.

स्थायी समितीचा ठराव
स्थायी समिती सदस्या योगिता नागरगोजे आणि मनीषा चिंचवडे यांनी महापालिका सभा दोन सप्टेंबर रोजी घेण्याचा ठराव २५ ऑगस्टच्या स्थायी समिती सभेत मांडला होता. तो सर्वानुमते मंजूर केला. त्यात म्हटले आहे की, महापालिका कार्यक्षेत्रात ईआरटीएस वाहतूक व्यवस्था, पार्किंग धोरण, मेट्रो मार्गिका, सार्वजनिक स्वच्छतागृह आदी महत्त्वाचे विषय आहेत. त्यांसह स्थायी समितीने यापूर्वी मंजूर केलेले विषय सप्टेंबरच्या सभेत घेण्यास मान्यता देण्यात येत आहे. सभावृत्तांत कायम होण्याची वाट न पाहता सदर ठरावाची अंमलबजावणी करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

महापौरांचे नगरसचिवांना पत्र
स्थायी समितीच्या २५ ऑगस्टच्या ठरावानुसार (क्रमांक १०६२) सप्टेंबर २०२६ ची सर्वसाधारण सभा बुधवार, दोन सप्टेंबर रोजी घ्यावी, असे पत्र महापौर लांडगे यांनी नगरसचिवांना दिले आहे.


मुंबई महापालिका अधिनियमानुसार, तहकूब सभेचे कामकाज ठरलेल्या सभेत पूर्ण करावे. परंतु, नवीन विषय समाविष्ट करता येत नाहीत. मात्र, तहकूब सभेतील विषय अन्य सभांमध्ये घेऊ नये, असे नमूद नाही. शिवाय, सर्वसाधारण सभा घेण्याचे अधिकार महापौरांना आहेत. त्यांनी दिलेल्या पत्रानुसार आणि स्थायी समितीच्या ठरावानुसार दोन सप्टेंबरला सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे. त्यात तहकूब सभेतील १८ विषयांचा समावेश केला आहे.
- मुकेश कोळप, नगरसचिव, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

North Cyprus Boat Accident : समुद्रात प्रवासी बोट उलटली; २७० जण बुडाल्याची भीती, दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ समोर

Officer Reshuffle: मोठा प्रशासकीय फेरबदल! ५६ बीएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, अनेक जिल्ह्यांमध्ये नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती

Divorce Maintenance : कर्मचाऱ्यांना झटका ! पत्नीला पोटगी दिली नाही तर थेट पगारातून कपात; सरकारचा मोठा निर्णय

Junnar Tourism : किल्ले शिवनेरीसह जुन्नर तालुक्यात पर्यटकांची प्रचंड गर्दी; हॉटेल व्यवसाय, रोजगाराला चालना

Eknath Shinde Parbhani : परभणीत एकनाथ शिंदेंच्या भाषणाला सुरुवात होताच ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा अन्... नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT