पुणे

शहरातील गुन्हेगारी विषयक बातम्या

CD

दोन महिलांची एकीला मारहाण
पिंपरी : ‘तुझा मुलगा माझ्या घराकडे का बघतोय,’ असे विचारल्यावरून झालेल्या वादात शेजारी राहणाऱ्या दोन महिलांनी एका महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत डोक्यात दगड मारून जखमी केले. पिंपरीतील भारतनगर परिसरात हा प्रकार घडला. या प्रकरणी तीस वर्षीय महिलेने पिंपरी पोलिस ठाण्‍यात फिर्याद दिली. त्यावरून दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
--------------

सील तोडल्याप्रकरणी दाम्पत्यावर गुन्हा
पिंपरी : न्यायालयाच्या आदेशानुसार दुकानाला लावलेले सील तोडून त्याठिकाणी कुलूप लावल्याप्रकरणी दाम्पत्यावर गुन्हा दाखल झाला. भोसरीतील इंद्रायणीनगरमधील जयदीप बिझनेस सेंटरमध्ये हा प्रकार घडला. या प्रकरणी संदीप पाटील यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी राजेंद्र अजितसिंग सोहळ व त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल केला. फिर्यादीच्या बँकेच्या ताब्यात गेलेल्या दुकानाचे सील तोडून आरोपींनी कुलूप लावले. त्यामुळे फिर्यादीने बँकेच्यावतीने तक्रार दिली.
------------------
जुगार प्रकरणी पाच जणांवर गुन्हा
पिंपरी : पवना नदीकाठी चिंचवडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने छापा टाकून पाच जणांवर गुन्हा दाखल केला. त्यांच्याकडून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. शाहनवाज नसिमुद्दीन अन्सारी (रा. खडकी), अरुण शिवनंदन सिंग (रा. बोपोडी), जमीर मुज्जमल शेख (रा. चिंचवड), अशोक दयाराम पंजवाणी (रा. पिंपरी) आणि मोहमद इब्रार मोहमद सिराज (रा. हडपसर) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून १५ हजार ६१० रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य केले. ​
------------

तडीपार गुंडाला पिस्तुलासह अटक
पिंपरी : जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार असूनही हद्दीत आलेल्या एका तडीपार गुंडाला पोलिसांनी अटक केली. चिंचवडमधील अजंठानगर परिसरात ही कारवाई करण्यात आली. ​करण उर्फ राजू ज्ञानदेव तिरकर (रा. अजंठानगर, चिंचवड) असे आरोपीचे नाव आहे. त्याला ७ जानेवारीला दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून ५० हजार रुपये किमतीचे एक पिस्तूल आणि दीड हजार रुपयांची तीन काडतुसे जप्त केली.
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand Protest Reason : 38 प्रश्न सोडवले, तरी सरकारी नोकरी, झारखंडमधील स्कॅम काय?

IND vs SLC XI Warm-Up: देवदत्त पडिक्कलचे अर्धशतक, तरीही पहिल्या कसोटीत संधी मिळणे अवघड; कारण 'तो' येतोय, नेमकं काय शिजतंय?

Siddhivinayak Temple : ठाकरे गटाची अडचण वाढणार? सिद्धिविनायक मंदिरातील देणगी व्यवहारांची मागील पाच वर्षांची होणार चौकशी; सीएम फडणवीसांचे आदेश

IPL 2027 Trade Update: हार्दिक पांड्याच नव्हे, तर Mumbai Indians 'या' पाच खेळाडूंना करू शकते संघाबाहेर; MI चा मास्टर प्लान

Latest Marathi News Live Update : "मोदी गद्दारांना सांगतायत, भीऊ नका मी पाठीशी"- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT