पुणे

85 हजार कुटुंबांना 24 तास पाणी

पीतांबर लोहार

पिंपरी  - अमृत योजनेअंतर्गत शहरात जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे येत्या दोन वर्षांत शहरातील ८५ हजार ४८ कुटुंबांना २४ तास पाणीपुरवठा होणार आहे. या कामासाठी सुमारे २४० कोटी ४६ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. 

शहरातील ४० टक्के भागाला २४ तास पाणीपुरवठा केला जात आहे. उर्वरित ६० टक्के भागासाठी अमृत योजनेतून पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी केंद्र सरकारचे ५० टक्के व राज्य सरकारचे २५ टक्के अनुदान मिळणार आहे. महापालिका २५ टक्के खर्च करणार आहे. दोन टप्प्यांत ही कामे होणार आहेत. त्यासाठी चार निविदा काढल्या असून, ठेकेदारांना वर्कऑर्डर दिल्या आहेत. काम पूर्ण करण्यासाठी त्यांना २४ महिन्यांची मुदत आहे. सध्या निगडीतील भक्ती-शक्ती चौक ते आकुर्डीतील खंडोबा माळ चौकातील पाण्याची टाकी आणि चिंचवड येथील बिजलीनगर ते वेताळनगर या दरम्यान जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. सर्व कामासाठी २०० मिलिमीटर व्यासाच्या १३६.७१ किलोमीटर आणि २०० मिलिमीटरपेक्षा कमी व्यासाच्या ४००.३७ किलोमीटर अंतरावर जलवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. 

अमृत योजनेअंतर्गत शहरातील ६० टक्के भागाला २४ तास पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. ठेकेदारांना वर्कऑर्डर दिलेल्या असून काम सुरू झाले आहे. 
- रवींद्र दुधेकर, कार्यकारी अभियंता, महापालिका

 पॅकेज 1
 किंमत - ५१.०१ कोटी
 ठेकेदार - अरिहंत कन्स्ट्रक्‍शन
 कुटुंबे - १७,६६६
 भाग - पिंपरी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, पिंपरी कॅम्प, दापोडी, रावेत, मामुर्डी, प्राधिकरण पेठ क्रमांक २८, सर्व्हे क्रमांक ९६

पॅकेज 2
 किंमत - ६१.२२ कोटी
 ठेकेदार - अरिहंत कन्स्ट्रक्‍शन
 कुटुंबे - १९,२७८
 भाग - काळा खडक, लक्ष्मण नगर, काळेवाडी, रहाटणी, पुनवळे, थेरगाव गावठाण, कावेरीनागर, पिंपळे निलख.

पॅकेज 3
 किंमत - ५४.३३ कोटी
 ठेकेदार - पी. पी. गोगड इंजिनिअरिंग अँड काँट्रॅक्‍टर
 कुटुंबे - २४,६०४
 भाग - कुदळवाडी, जाधववाडी, खंडोबा माळ, मोरेवस्ती, चिखली, पेठ क्रमांक १ व २, रुपीनगर, शाहूनगर, पाटीलनगर.

पॅकेज 4
 किंमत - ५५ कोटी
 ठेकेदार - शिवरत्न कन्स्ट्रक्‍शन
 कुटुंबे - २३,५००
 भाग - नेहरूनगर, पांजरपोळ, मोशी, वडमुखवाडी, चऱ्होली, बोपखेल, दिघी, मॅगझीन कॉर्नर, डुडुळगाव, इंद्रायणीनगर, कासारवाडी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Parbhani : परभणीत एकनाथ शिंदेंच्या भाषणाला सुरुवात होताच ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा अन्... नेमकं काय घडलं?

अमेरिकेत शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांवर नवे निर्बंध! CPT इंटर्नशिप का आली अडचणीत? भारतीय विद्यार्थ्यांवरही परिणाम होणार?

Pimpalvandi Minor Murder Case: पिंपळवंडीतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार-हत्येप्रकरणी २ सप्टेंबरपर्यंत चार्जशीट; फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवण्याचा मंत्र्यांचा निर्धार

Relationship Numerology: 'या' मूलांकांच्या नणंद-भावजयीची जोडी असते सुपरहीट; पाहा अंकशास्त्रातील ३ सर्वात बेस्ट कॉम्बिनेशन्स!

Sunil Sharma Death : राजकारणात खळबळ! भाजपच्या दिग्गज नेत्याने जीवन संपवलं; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT