पुणे

चिंचवडमध्ये एक्‍साईडतर्फे स्वच्छतागृह 

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - एक्‍साईड इंडस्ट्रीज कंपनीतर्फे व्यावसायिक-सामाजिक बांधिलकी (सीएसआर) उपक्रमातून चिंचवड येथील एसकेएफ कंपनीजवळ बांधलेल्या महिला व पुरुषांसाठीच्या सार्वजनिक स्वच्छतागृहाचे हस्तांतर गुरुवारी पालिकेकडे केले. 

काळभोरनगर येथील पालिका शाळेमधील मुलींच्या स्वच्छतागृहांमध्ये बसविलेल्या सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशिनचे हस्तांतरणही केले. उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे, "ब' प्रभाग अध्यक्ष सचिन चिंचवडे, नगरसेविका आशा धायगुडे-शेंडगे, झामाबाई बारणे, माधुरी कुलकर्णी, करुणा चिंचवडे, मीनल यादव, नगरसेवक नामदेव ढाके, सह-आयुक्त दिलीप गावडे, सहायक आयुक्त संदीप खोत, आशादेवी दुरगुडे, एक्‍साईड इंडस्ट्रीज लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी के.अनिरुद्ध, अधिकारी संजय गायकवाड, निम्हा गिध आदी उपस्थित होते. 

एक्‍साईडतर्फे यापूर्वी केएसबी चौक व थरमॅक्‍स चौकात (चिंचवड) महिला व पुरुषांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहांची उभारणी केली आहे. कंपनीने सीएसआरच्या माध्यमातून सुमारे 35 लाख रुपये खर्च केला आहे. कंपनीतर्फे आकुर्डी, काळभोरनगर-चिंचवड, रुपीनगर-निगडी, श्रमिकनगर-निगडी येथील महापालिकेच्या माध्यमिक शाळेतदेखील सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशिन बसवून त्याचे महापालिकेस हस्तांतर केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT