पुणे

प्रवेशप्रक्रिया जानेवारीअखेरीस सुरू 

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत 25 टक्के कोट्यातील प्रवेशप्रक्रियेला जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात सुरवात होणार आहे. पालकांना पसंतिक्रमांकाच्या ऑनलाइन अर्जात केवळ दहा शाळांची नावे भरावी लागणार आहेत. लॉटरीत पहिल्या क्रमांकावर लागणाऱ्या शाळेत प्रवेश घ्यावा लागणार आहे. प्रवेश घेतला नाही, विद्यार्थी प्रवेशप्रक्रियेच्या बाहेर होणार आहे, असे संभाव्य बदल केले आहेत. 

शालेय शिक्षण विभागाकडून आरटीई प्रवेशप्रक्रियेला 24 जानेवारीपासून सुरवात होणार आहे. सहभागी होणाऱ्या शाळांच्या नोंदणीला बुधवारपासून (ता. 3) सुरवात झाली. शाळांच्या प्रशासनाला 3 ते 20 जानेवारीपर्यंत नोंदणी करावी लागेल. 22 व 23 जानेवारी रोजी नोंदणी केलेल्या शाळांची पडताळणी करण्यात येणार आहे. 24 जानेवारीपासून पालकांना ऑनलाइन अर्ज भरण्यास संधी दिली जाणार आहे. पालकांना 24 जानेवारी ते 10 फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरू शकतील. पहिली लॉटरी 12 व 13 फेब्रुवारीला काढण्यात येईल. त्यानंतर 14 ते 22 फेब्रुवारीपर्यंत प्रवेश घ्यायचा आहे. एक किलोमीटर व तीन किलोमीटरच्या आत शाळा असल्याचे बंधन असल्याने प्रवेशाची केवळ एकच संधी मिळणार आहे. पूर्वी एका विद्यार्थ्याला दोन शाळांची ऍलॉटमेंट मिळायची. पण यंदा एकच शाळा ऍलॉटमेंट होणार असल्याने प्रवेशप्रक्रिया सुकर होणार आहे. 

पालकांच्या अपेक्षा 
* प्रवेशफेरीचा लकी ड्रॉ घोषित करण्यापूर्वी एखाद्याचा जर अर्ज चुकला असेल, तर त्यांना एडिट करण्याची सुविधा मिळावी. 
* अनेकदा शांळाकडून प्रवेशाला नकार दिला जातो. नकारांचे अधिकार मुख्याध्यापक लॉगिन न देता शिक्षणाधिकाऱ्यांच्या लॉगिनला द्यावेत. 
* मदत केंद्रात प्रशिक्षित कर्मचारी असावेत. 
* ज्या ठिकाणी संगणक सुविधा आहेत त्या ठिकाणीच मदत केंद्रे सुरू करावीत. 
अशा अपेक्षा पालकांनी सकाळकडे व्यक्त केल्या. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonia Gandhi Babri Masjid : बाबरी मशीद पाडल्यावर सोनिया गांधींना कोसळलेले रडू; भाजप नेते म्हणाले- काँग्रेसच्या हृदयात आजही बाबर जिवंत

Mohammed Shami शिवाय भारतीय वेगवान गोलंदाजी अपूर्ण, तो न्यूझीलंड दौऱ्यात हवा होता, रवी शास्त्री स्पष्टच बोलले

ST Bus Service :दिवाळीसाठी वाशीम आगारातून बसफेऱ्यांत वाढ;प्रवाशांच्या गर्दीचा विचार करून अतिरिक्त बससेवा

Latest Marathi News Live Update: अभिनेते रजनीकांत यांनी चेन्नईतील निवासस्थानाबाहेर चाहत्यांची घेतली भेट

IPL 2027 Trade: हार्दिक पांड्या ट्रेड होणार, पण कोणता खेळाडू मुंबई संघात येणार? MI आणि पंजाब किंग्समधील डील अंतिम टप्प्यात

SCROLL FOR NEXT