पुणे

वीजबिलांची दुरुस्ती ऑनलाइन

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - ‘महावितरण’च्या ग्राहकांना वीजबिल दुरुस्ती करण्यास अडचण होऊ नये, यासाठी ग्राहकांच्या वीजबिलांची दुरुस्ती प्रक्रिया ऑनलाइन केली आहे. या प्रक्रियेत ग्राहकांना राज्यातील ‘महावितरण’च्या कोणत्याही कार्यालयात तक्रार दाखल करता येणार असून, ती निश्‍चित कालमर्यादेत सोडविण्यात येणार आहे. याबाबतचा एसएमएसही ग्राहकांना मिळणार आहे.

वीजबिलाच्या तक्रारी सोडविण्यासाठी ग्राहकांना प्रत्यक्ष संबंधित कार्यालयात वारंवार जावे लागते. यावर उपाययोजना करण्यासाठी ‘महावितरण’चे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी ही प्रक्रिया सुलभ व ऑनलाइन करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार नव्या ऑनलाइन प्रक्रियेत ग्राहकांना वीजबिलासंबंधीची तक्रार लेखी, महावितरण मोबाईल ॲप, ई-मेल व टिट्‌वर इत्यादी माध्यमांतून मुंबई मुख्यालयासह महावितरणच्या कोणत्याही कार्यालयात करता येईल. या तक्रारीच्या सोडवणुकीसाठी मुख्यालय ते शाखा कार्यालयांपर्यंतच्या प्रत्येक कार्यालयात विशिष्ट कर्मचाऱ्यांवर तक्रार सोडविण्याची जबाबदारी निश्‍चित करण्यात आली आहे. तक्रार आल्यानंतर ती किमान नऊ दिवसांत सोडवावी, असे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत. 

ग्राहकांचे वीजबिल बरोबर असेल, तर त्याबाबत ग्राहकाला एसएमएस प्राप्त होईल व त्यात संबंधित वीजबिल भरण्याचे आवाहन करण्यात येईल; परंतु जर ग्राहकाच्या वीजबिलात दुरुस्ती करण्याची गरज असेल तर ते वीजबिल संबंधित शाखा कार्यालयात पाठविण्यात येईल. या शाखा कार्यालयामार्फत ग्राहकांच्या वीजबिल तक्रारीसंदर्भात आवश्‍यक ती प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येईल. यानंतर सुधारणा केलेले अंतिम वीजबिल ग्राहकाला एसएमएसद्वारे पाठविण्यात येईल. हा एसएमएस दाखवून ग्राहकाला वीजबिलाचा भरणा करता येईल.

‘महावितरण’ने या संदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केले असून, यात ऑनलाइन वीजबिल दुरुस्तीची संपूर्ण प्रक्रिया नमूद केली आहे. या नव्या उपाययोजनांमुळे ग्राहकांना वीजबिल दुरुस्ती करणे अधिक सुलभ होईल. त्यांच्या तक्रारींचे निरसनही तातडीने होईल.
- संजीव कुमार, व्यवस्थापकीय संचालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'तू माझ्यासाठी सर्वात मौल्यवान...'; कतरिना कैफची पोस्ट चर्चेत, मुलगा विहानची सुद्धा दाखवली झलक

FIFA World Cup 2026 Final: अर्जेंटिनाचं टेन्शन वाढवणारं वक्तव्य! फायनलआधी रॉड्रीने उघड केला स्पेनच्या विजयाचा सीक्रेट प्लॅन

Live Updates Marathi: एकनाथ शिंदे यांचा चंद्रभागेत नौकविहार

Maharashtrian Recipe: तिखट खायला आवडतं? घरीच बनवा झणझणीत,सुकी लाल मिरची चटणी!

Pune News: कॅनॉलच्या कठड्यावर लटकलेल्या चारचाकी गाडीतील चालकाला उरुळी कांचन पोलिसांनी शिताफीने सुखरूप बाहेर काढले

SCROLL FOR NEXT