पुणे

काळेवाडी-रहाटणीत आशीर्वाद कुणाचा? 

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - काळेवाडी, रहाटणी परिसरात अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून, महापालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींचा बांधकामांना आशीर्वाद असल्याचे नागरिकांकडूनच बोलले जात आहे. 

कुठे सुरू आहेत 
काळेवाडी : तापकीरनगर, विजयनगर, ज्योतिबानगर, नढेनगर, राजवाडेनगर, तापकीर चौक. 
रहाटणी : रामनगर, वैदवस्ती, लिंक रोड, नखातेनगर, श्रीनगर. 

काय होतंय 
- मजल्यावर मजले चढविले जाताहेत. 
- बांधकाम जुने वाटण्यासाठी रातोरात रंगरंगोटी. 
- काही धार्मिक स्थळांचेही वाढीव बांधकाम. 

वस्तु:स्थिती 
संबंधित बीट निरीक्षक व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागातील अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकामे सुरू असल्याची चर्चा आहे. एखाद्या बांधकामाच्या पायासाठी खड्डा खोदताच किंवा वाढीव बांधकामासाठी साहित्य आणताच याची खबर बीट निरीक्षकांना असते. मात्र, संबंधितांकडून तोडपाणी करताच बांधकामाकडे डोळेझाक केली जाते. 

अशी बनवाबनवी 
तापकीर चौकात बीआरटी रस्त्यालगत रातोरात वाढीव बांधकाम करण्यात आले. त्यानंतर बांधकाम दिसणार नाही यासाठी समोरच्या बाजूला विविध होर्डिंग्ज लावले. काही दिवसांत प्लास्टर करून रंगकाम केले. सध्या हे बांधकाम जुने वाटत असून, अजूनही वरच्या मजल्यावर बांधकाम सुरू आहे. मात्र, हे बांधकाम प्राधिकरण की महापालिकेच्या हद्दीत या गोंधळामुळे दुर्लक्षित केले जात आहे. 

बकालपणात वाढ 
काळेवाडी, रहाटणी परिसराला अगोदरच अनधिकृत बांधकामांमुळे बकालपणा आला आहे. त्यात लोकप्रतिनिधी व महापालिका प्रशासनाच्या डोळेझाकीमुळे परिसराचे स्टॅंडर्ड झोपडपट्टीत रूपांतर होत आहे. आगीसारखा अनुचित प्रकार घडल्यास तत्काळ सेवा मिळणे कठीण आहे. 

घरभाड्याची लालसा 
परिसरात भाडेतत्त्वावरील खोल्या व दुकानांची मागणी वाढल्याने अनेकांनी लालसेपोटी मजल्यावर मजले चढविण्यास सुरवात केली आहे. मात्र, अशा बांधकामांमुळे पाणीपुरवठा, रस्ते यांसह इतर सार्वजनिक सेवांवर ताण पडत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Mumbai Expressway : मिसिंग लिंक प्रकल्प अंतिम टप्प्यात; महामार्गावरील वाहतूक कोंडी फुटण्यास आणखी तीन महिने प्रतीक्षा

Pune Wildlife News : शिरूर तालुक्यात बिबट्याचे तीन बछडे आढळल्याने उडाली खळबळ; शेतकरी, ऊसतोड मजुरांमध्ये भीतीचे वातावरण

Pune-Mumbai Traffic Jam : ‘एसटी’ला पंधरा लाखांचा फटका, द्रुतगती मार्गावरील कोंडीचा परिणाम; गुरुवारी ६६ शिवनेरी बस रद्द

Latest Marathi News Live Update : विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी संभाजी भगत यांची निवड

Mumbai-Pune Expressway Traffic jam : द्रुतगतीवरील कोंडी धोक्याची घंटा, महामार्गावर आपत्ती व्यवस्थापनाची कसोटी; यंत्रणांतील मर्यादा उघड

SCROLL FOR NEXT