पुणे

पिंपरी : पोलिसच आरोपींचे "हात' 

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - माजी नगरसेवक कैलास कदम यांच्या खुनाची सुपारी घेतलेल्या सराईत गुन्हेगारांना पळवून लावण्यास मदत करणाऱ्या दोन पोलिसांना गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने पुणे पोलिस मुख्यालयातून अटक केली. त्यांना पिंपरी न्यायालयाने शुक्रवारपर्यंत (ता. 22) पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणातील अटक केलेल्यांची संख्या सात झाली आहे. 

हवालदार विजय रामदास वाघमारे (वय 38, रा. पोलिस वसाहत, वानवडी) आणि निलंबित पोलिस कर्मचारी सुभाष कुंडलिक खाडे (वय 38, रा. भेकराईनगर, फुरसुंगी) यांच्यासह गणेश रघुनाथ अहिवळे (वय 35) व विनयकुमार रामसंजीवन कुर्मी (वय 33, दोघे रा. पिंपरी) या चौघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात यापूर्वी ऍड. सुशील मंचरकर, सुरेश स्वामिनाथ झेंडे आणि राजू ऊर्फ काल्या महादेव पात्रे यांना अटक झाली आहे. 

अटक केलेल्या पोलिसांनी मंचरकर याच्या सांगण्यावरून सुरेश स्वामिनाथ झेंडे याच्या साह्याने काल्या ऊर्फ राजू महादेव पात्रे, संतोष मच्छिंद्र जगताप, लुभ्या ऊर्फ संतोष चिंतामण चांदिलकर या सराईत गुन्हेगारांना मोरवाडी न्यायालयाजवळून पळून जाण्यात मदत केली होती. या तिघांना मंचरकर याने माजी नगरसेवक कैलास कदम यांना मारण्यासाठी 30 लाख रुपये व शस्त्र दिले होते. मात्र, हे आरोपी मोरवाडी न्यायालयाऐवजी कात्रजच्या घाटातून पळून गेल्याचा बनाव तपासात उघड झाला होता. फरारी काल्या, संतोष व लुभ्या यांच्यावर विविध पोलिस ठाण्यांत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने त्यांची रवानगी येरवडा कारागृहात केली होती. 

येरवडा कारागृहातून सातारा येथील गुन्ह्यासंदर्भात 10 एप्रिलला खंडाळा येथे या आरोपींना हजर करण्यात आले होते. तेथून परतताना लघुशंकेसाठी पोलिस व्हॅन कात्रज घाटात थांबविण्यात आली होती. त्या वेळी तिघांनी पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाल्याची खोटी तक्रार संबंधित पोलिसांनी दाखल केली होती. परंतु या प्रकरणाचा तपास करत असताना आरोपी कात्रज येथून नव्हे; तर मोरवाडी येथून पळून गेल्याचे भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजयसिंह गायकवाड, सहायक निरीक्षक सूर्यवंशी यांनी उघड केले. पुढे या प्रकरणाचा तपास करत असताना गुन्हे शाखेला धक्कादायक माहिती समोर आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Pune News : विनापरवाना लावणीचा कार्यक्रम; मंडळाच्या अध्यक्षांसह नृत्यांगना राधा पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

Social Media: 'Likes' मुळे वाढतोय मानसिक ताण? Post's च्या मोहात अडकतात डिप्रेशनग्रस्त लोक; संशोधनातून धक्कादायक खुलासा!

Marathi News Live Updates: तळेगाव ढमढेरे परिसरात विजेमुळे ग्रामस्थ त्रस्त

आई म्हणाली ‘चॉकलेट बंद कर’; स्क्वॉशपटू अनाहतने थेट न्यूट्रिशनिस्टलाच फोन केला! नेमकं काय घडलं? Viral Video

SCROLL FOR NEXT