पुणे

मेट्रो, बीआरटीसाठी करणार झाडांचे स्थलांतर 

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - शहरातील जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावर सुरू असलेल्या मेट्रो आणि बीआरटी या विकास कामांमुळे परिसरातील हिरवाई गायब होणार आहे. महापालिकेच्या उद्यान विभागाने या रस्त्यावरील चार हजार 567 चौरस मीटरचे सुशोभीकरण आणि 367 झाडे अन्यत्र हलविण्यास मान्यता दिली आहे. याखेरीज या मार्गावरील 119 झाडांच्या फांद्या देखील तोडण्यास उद्यान विभागाने परवानगी दिलेली आहे. 

सध्या जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर पिंपरी ते कासारवाडी दरम्यान ग्रेडसेपरेटर मधील जागेत मेट्रोचे पिलर उभारण्याचे काम सुरू आहे. याखेरीज निगडी ते दापोडी ही बीआरटी बससेवा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे कासारवाडी जवळील बीआरटी मार्गालगत असणारी झाडे काढून ती अन्यत्र लावण्याचे काम जोरात सुरू आहे. पिंपरी ते कासारवाडी दरम्यान सुरू असणाऱ्या मेट्रोच्या कामामध्ये आतापर्यंत रस्त्याच्या मध्यभागी करण्यात आलेले सुशोभीकरण काढण्यात आले आहे. पिंपरी ते रेंजहिल्स हा मेट्रोचा पहिला टप्पा राहणार असल्यामुळे कासारवाडी ते दापोडी दरम्यान मेट्रोच्या कामाला सुरवात झाल्यानंतर रस्त्याच्या दुभाजकांमध्ये करण्यात आलेले सुशोभीकरण काढण्यात येणार असल्याचे उद्यान विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. 

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर असणारी 367 झाडे काढल्यानंतर त्याची लागवड प्राधिकरणातील जागेवर करण्यात येणार आहे. रस्त्याच्या मध्यभागी असणारे सुशोभीकरण मेट्रो मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा केले जाण्याची शक्‍यता या अधिकाऱ्याने बोलून दाखविली. 

दरम्यान, विकास कामामध्ये येणारी झाडे काढण्यासाठी संबंधित यंत्रणांनी महापालिकेकडे अर्ज केला होता. त्यानंतर त्यांना परवानगी देण्यात आल्याचे महापालिका उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cristiano Ronaldo Retirement News: "होय, हा माझा शेवटचा वर्ल्ड कप होता, पण..."; रोनाल्डोची निवृत्तीबाबत मोठी घोषणा; म्हणाला, मी माझे सर्वस्व दिले...

SET Date Change: एमपीएससी परीक्षा व आषाढी वारीमुळे राज्यस्तरीय सेट परीक्षा २६ जुलैऐवजी ६ सप्टेंबरला; विद्यार्थ्यांच्या मागणीला विद्यापीठाची मान्यता

Latest Marathi News Update : संत एकनाथ महाराज पालखी प्रस्थान सोहळा सुरू

Abhishek Sharma: AI व्हिडिओंमुळे अभिषेक शर्माची कोर्टात धाव; 'माझ्या नावाचा गैरवापर थांबवा', दिल्ली हायकोर्टात याचिका

राजभवनातील SRPF जवानाच्या मृत्यूला नवं वळण! महिला कॉन्स्टेबलशी वाद; प्रेमसंबंधाचे फोटो पतीला पाठवले नंतर... धक्कादायक माहिती समोर

SCROLL FOR NEXT