पुणे

‘पवना’ लोकचळवळ व्हावी

सकाळवृत्तसेवा

वाल्हेकरवाडी - जलपर्णीमुक्‍त पवना नदीसाठी लोकचळवळ उभारा, शहराला मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी महापालिका, राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जाईल, असे आश्‍वासन खासदार अमर साबळे यांनी जाधव घाट येथे दिले.

रोटरी क्‍लब ऑफ वाल्हेकरवाडी, जलमैत्री अभियान, भावसार व्हिजन इंडिया, शेखर चिंचवडे यूथ फाउंडेशन, 

जेएसपीएम महाविद्यालय ताथवडे या संस्थांच्या माध्यमातून वाल्हेकरवाडी येथील पवना नदी स्वच्छतेच्या मोहिमेला १७ दिवसांपूर्वी सुरवात करण्यात आली. भावसार व्हिजनचे राजीव भावसार, रोटरी क्‍लब ऑफ वाल्हेकरवाडीचे प्रदीप वाल्हेकर, नदी संवर्धन मोहिमेत १७ वर्षे काम करणारे सोमनाथ मसुडगे, सोमनाथ हरपुडे, युवराज वाल्हेकर, माता जोगेश्वरी महिला बचत गटाच्या अध्यक्षा माया वाल्हेकर, वासंती कुऱ्हाडे आदींनी पुढाकार घेऊन ही सुरू केली. साबळे म्हणाले,  पवना नदी संवर्धन व स्वच्छता अतिशय महत्त्वाची आहे. त्यासाठी वेगळी समिती स्थापन करून जलपर्णीचा समूळ नाश, दूषित पाणी इ. गोष्टींचा विचार केला जाणार आहेत. जलपर्णीमुक्त पवना ही फक्त वाल्हेकरवाडी, रावेत किंवा नदीच्या परिसरात राहणाऱ्यांची न राहता ती मोठी लोकचळवळ झाली पाहिजे. दर रविवारी नदी संवर्धनासाठी येणार असल्याचे त्यांनी सांगितले. नदीपात्रातून आतापर्यंत ५० ट्रक जलपर्णी काढण्यात आली. जलपर्णी जमा होण्यासाठी वालरोप बांधले होते. त्यावरील साचलेली जलपर्णी काढण्यात आली. 

इंद्रायणीप्रमाणे पवना नदीतील जलपर्णी नष्ट करणार आहोत. त्यासाठी रोटरी क्‍लबने घेतलेला हा पुढाकार नक्कीच कौतुकास्पद आहे. त्याबद्दल मी नागरिकांचा आभारी आहे. दर रविवारी प्रत्येक घाटावर स्वच्छता केली जाणार आहे. जलपर्णी समूळ नष्ट केल्यानंतरच हे काम थांबणार आहे. 
- सोमनाथ मसुगडे, सदस्य,     इंद्रायणी स्वच्छता अभियान.

पवनामाई स्वच्छ सुंदर करण्याचा संकल्प आम्ही केला. त्यासाठी दर रविवारी आम्ही जमत आहोत, शहर स्वच्छ राहण्यासाठी आम्ही हे काम हाती घेतले आहे. रावेतपासून मोहिमेची सुरवात केली. नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. 
- प्रदीप वाल्हेकर, अध्यक्ष, रोटरी क्‍लब वाल्हेकरवाडी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT