पुणे

मालामाल ‘डेली’

सकाळवृत्तसेवा

महापालिका ही आर्थिक संपन्नता असणारी महापालिका आहे. या महापालिकेला रोज विविध कर व दिलेल्या सेवांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न प्राप्त होते. ते महापालिका विविध बॅंकांमध्ये चालू खात्यात जमा करते. त्यातून अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतन आणि विकासकामांसाठी लागणारा निधी खर्च केला जातो. महापालिकेला मिळणाऱ्या उत्पन्नाव्यतिरिक्त केंद्र व राज्य सरकारकडून मोठ्या प्रकल्पांसाठी कोट्यवधींचा निधी प्राप्त होतो. तो लगेच खर्च होत नसल्याने विविध बॅंकांमध्ये दिर्घमुदत ठेवीच्या स्वरूपात ठेवला जातो. उत्पन्नात भर घालण्याच्या दृष्टीने रोज मिळणारे उत्पन्नही अल्पमुदत ठेवींच्या स्वरूपात विविध बॅंकांमध्ये ठेवण्याचा निर्णयाला भाजपने पाठबळ दिले. 

चालू खात्याचा फायदा बॅंकांनाच
रोजचे कोट्यवधींचे उत्पन्न चालू खात्यात जमा करत असल्याने त्याचा फायदा संबंधित बॅंकांचा होत होता. त्यामुळे लांडे यांनी अल्पमुदत ठेवींमुळे महापालिकेच्या उत्पन्नात चांगली भर पडेल, असा सल्ला दिला. त्यानुसार महापालिकेच्या चालू खात्यांमधील जमा रक्कम अल्पमुदत ठेवींच्या स्वरूपात बॅंकांमध्ये ठेवण्याची अंमलबजावणी सुरू केली. 

जाहिरातीतून मागवली माहिती
अल्पमुदत ठेवीसाठी महापालिकेने जाहिरात प्रसिद्ध करून विविध बॅंकांकडून ठेवींवर किती व्याजदर देणार याची माहिती मागविली होती. त्यातील सर्वाधिक व्याजदर देणाऱ्या बॅंकांमध्ये अल्पमुदतीच्या ठेवी ठेवण्यास सुरवात केली. त्यामुळे महापालिकेला अल्पमुदत ठेवीतून एकूण ५० कोटी ११ लाख ८८ हजार रुपये व्याज मिळाले आहे. यापूर्वी मुदत ठेवीतून १५५ कोटी ८३ लाख १३ हजार रुपयांचे व्याज मिळत होते.

३००० कोटींच्या ठेवी
आजमितीला महापालिकेने विविध बॅंकांमध्ये एकूण दोन हजार ९५७ कोटी ९२ लाख ८१ हजार रुपये अल्पमुदत ठेवींच्या स्वरूपात आहेत. त्यातून २५५ कोटी ८३ लाख १३ हजार रुपये महापालिकेला मिळाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aryavir Sehwag Century: १७ चौकार अन् ७ षटकार... ज्युनियर सेहवागची दीडशतकी खेळी अन् शुभमन गिलच्या विक्रमाची केली बरोबरी

Viral Video : लेकीची दिवाळी साजरी करण्यासाठी आईने शेळी विकली...भावनिक व्हिडिओ व्हायरल

पुढच्या पाच दिवसांत ५ राशींचं नशीब चमकणार! वक्री शुक्र देणार भरभरून लाभ, उत्पन्नाचे नवे मार्गही खुलणार

Annasaheb Jolle Halsiddhnath Sugar Factory: निपाणीच्या हालसिद्धनाथ साखर कारखान्याची २०२६-२७ हंगामासाठी ३७७० रुपये पहिली उचल जाहीर

Sonia Gandhi Book : "अजिबात नाही!"; भारताचे पंतप्रधानपद का नाकारले? अनेक वर्षांनंतर गांधी घराण्यातील 'त्या' निर्णयामागचे सत्य उघड!

SCROLL FOR NEXT