पुणे

पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत पीसीएमसी कॉलनीतील रहिवाशी

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडी येथे ३० ते ३५ वर्षांपूर्वी बांधलेल्या पीसीएमसी कॉलनीची अत्यंत दुरवस्था झाली आहे. त्यातील अनेक इमारती ढासळण्याच्या स्थितीत आहेत. येथील रहिवाशांचे लवकर पुनर्वसन करावे. तसेच पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी भाजप कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केली. 

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी नुकताच निगडी येथील विकासकामांचा पाहणी दौरा केला. त्या वेळी काळभोर यांनी त्यांना लेखी निवेदन दिले. त्यामध्ये म्हटले आहे, की महापालिका प्रशासनाने १९७७ मध्ये नऊ इमारतींची पीसीएमसी कॉलनी बांधली. एका इमारतीत ६४ अशा एकूण ५७६ सदनिकांची ही कॉलनी आहे. सध्या तेथे दीड ते दोन हजार रहिवासी राहत आहेत. मात्र, कॉलनीची पूर्णपणे वाताहत झाली आहे. इमारतीतील जिनेही मोडकळीस आले आहेत. मैलापाणी वाहिन्या जागोजागी फुटल्याने मैलापाणी रस्त्यावर पसरले आहे. एकाही इमारतीत महावितरणची अधिकृत जोड नाही. या वसाहतीचे पुनर्वसन करावे, अशी मागणी येथील रहिवासी गेल्या १० ते १५ वर्षांपासून करत आहेत. याबाबत लवकर निर्णय घ्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSP hike 2026: मोदी सरकारचा शेतकऱ्यांसाठी मास्टरस्ट्रोक! १४ खरीप पिकांच्या MSP मध्ये वाढ, कापूस-सूर्यफूल उत्पादकांना मोठा फायदा!

IPL 2026 : चेन्नईच्या ताफ्यात दाखल झालेला Macneil Hadley Noronha कोण? UAEत बालपण; DC, KKR, MI साठी दिलेलं ट्रायल...

Mumbai: मुंबईकरांच्या स्वयंपाकघरावर महागाईचा तडाखा! भाजीपाल्याचे भाव वाढले; जाणून घ्या सध्याचे दर...

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी केरळमच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी दाखल

SC on Hinduism: श्रद्धा सिद्ध करण्यासाठी मंदिरात जाण्याची गरज नाही, हिंदू धर्माबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण

SCROLL FOR NEXT