पुणे

'ब्लॅकमेलिंग करणारेच आता कारभारी'

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - ज्यांचे आयुष्य ‘ब्लॅकमेलिंग’ करण्यात गेले, त्यांच्या हातून चांगला कारभार कसा होणार, असा रोखठोक सवाल करत खासदार श्रीरंग बारणे यांनी भाजपचे सत्तारूढ पक्षनेता एकनाथ पवार यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. राष्ट्रवादीने केलेल्या चुका, सामान्यांच्या मूलभूत प्रश्‍नांकडे केलेले दुर्लक्ष आणि मोदी लाटेमुळे भाजपच्या त्रिकुटाला सत्ता मिळाल्याची टीकाही केली.

महापालिकेत सत्तेत येऊन भाजपला सहा महिने झाले. नागरिकांच्या असंख्य तक्रारी येऊ लागल्याने बारणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन समस्यांचा पाढा वाचला. कचरा, पाणी, आरोग्य अशा अनेक समस्या मांडल्या. शहरभर तक्रारी वाढल्याची कबुली आयुक्तांनी दिली. याची मिरची झोंबलेल्या एकनाथ पवार यांनी आपल्यावर खालच्या भाषेने टीका केली, ती भाजपसारख्या सुसंस्कृत पक्षाला शोभणारी नाही, असे बारणे यांनी म्हटले आहे.

ते म्हणाले, ‘‘नागरिकांच्या समस्यांपासून लक्ष विचलित व्हावे, म्हणून खालच्या भाषेत आपण टीका केली; पण खुद्द आयुक्तांनी शहरात कचरा, पाणी, सांडपाणी या तक्रारी वाढल्याची कबुली दिली. एकनाथ पवार त्रिकुटाला महापालिकेचा कारभार करता येत नसल्याचे गेल्या सहा महिन्यांत सिद्ध झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हातात झाडू घेऊन जनतेला स्वच्छतेचा संदेश दिला. हे विसरू नये शहराचा एवढा कचरा करून ठेवला आहे, तो साफ करण्यासाठी शहरातील जनतेलाच आपण झाडू हातात घेण्यास भाग पाडले. त्याच झाडूने एक दिवस शहरातील जनता तुम्हाला साफ करेल. तुमचा कारभार फक्त पत्रकबाजीवर सुरू असून तो सुधारण्याचे सोडून दुसऱ्यांवर टीका करण्यातच तुम्ही धन्यता मानत आहात.’’ टीका करून कारभाराची पाठ बडवून घ्यावी, असे वाटत असल्यास दररोज पत्रक काढून टीका करा, असा सल्लाही त्यांनी दिला.

शहरात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. ना घंटागाडी वेळेवर येते, ना कचरा उचलला जातो. सहा महिन्यांत सत्ताधाऱ्यांनी संपूर्ण शहराचा कचरा केला आहे. पवना धरण शंभर टक्के भरूनही भर पावसाळ्यात नागरिकांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis Satej Patil : मुख्यमंत्री फडणवीस सतेज पाटील यांच्या घरी, दोन्ही भावांना दिला आधार; डी. वाय. पाटील कुटुंबीयांचे सांत्वन

ODI World Cup मधूनच बाहेर होण्याची वेस्ट इंडिजवर पुन्हा टांगती तलवार, थेट एन्ट्री हुकली! काय आहे यामागचं गणित?

Plane Crash Baramati : बारामतीत पुन्हा विमान दुर्घटना; प्रशिक्षण विमान कोसळलं

Marathi News Live Updates : कॉकरोच म्हणणाऱ्यांकडून डिग्री घेणं...; दीक्षांत सोहळ्याला सरन्यायाधीशांना बोलावल्याने विद्यार्थी संतापले

Nalasopara Accident: भारत पेट्रोलियमच्या गॅस वितरण वाहनाने दुचाकीस्वाराला उडवलं, तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT