पुणे

वारंवार बदल्यांमुळे पीएमपीचे कर्मचारी त्रस्त

सकाळवृत्तसेवा

चिखली - कोणतेही कारण न देता वारंवार बदल्या केल्या जात असल्याचे पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपीएमएल) कर्मचारी त्रस्त झाले आहेत. 

बदल्यांमुळे वारंवार रूम बदलावी लागत आहे. मुलांच्या शिक्षणाची गैरसोय होत असल्याची भावना या कर्मचाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली. ‘पीएमपीएल’मधील चालक-वाहक असलेल्या सुमारे ८० कर्मचाऱ्यांच्या नुकत्याच वेगवेगळ्या आगारांत बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यातील काही कर्मचाऱ्यांच्या तर चार महिन्यांत दोन-दोन वेळा बदल्या केल्याचे सांगितले आहे; तर काहींनी शेवटचे काही वर्ष राहिल्याने बदली करणे अयोग्य असल्याचे सांगितले आहे. 

काही कर्मऱ्यांची घरे पिंपरी-चिंचवड परिसरात आहेत; तर काहीजण या परिसरात भाड्याने राहात आहेत. त्यांची मुलं पिंपरी-चिंचवड परिसरात शिक्षण घेतात. मात्र, बदल्या केल्यानंतर या कर्मचाऱ्यांना अडचणी निर्माण होत आहेत. पिंपरी-चिंचवड परिसरात राहणाऱ्या किंवा कर्मचाऱ्यांची पुण्यातील स्वारगेट, हडपसर किंवा कात्रज आगारात बदली केल्यानंतर त्यांना कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी एक दीड तास लागतो. खोली बदलावी तर मुलांच्या शिक्षणाची अडचण येत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.  

याबाबत बोलताना अशोक जाधव म्हणाले, ‘‘कोणत्याही कर्मचाऱ्याला जाणून-बुजून त्रास देण्यासाठी बदल्या करण्यात आलेल्या नाहीत. पुणे महानगर परिवहन महामंडळ ही सार्वजनिक बसव्यवस्था आहे. ती सक्षम व्हावी अशी अपेक्षा आहे. त्यामुळे नागरिकांना प्रवास करताना चांगली वागणूक मिळावी अशी अपेक्षा असते; परंतु काही कर्मचारी प्रवाशांशी गैरवर्तन करतात. प्रवाशांशी हुज्जत घालतात. अशा कर्मचाऱ्यांविरुद्ध प्रवाशांच्या तक्रारी आलेल्या आहेत. अशा कर्मचाऱ्यांवर सरळ कारवाई करण्याऐवजी त्यांना सुधारण्यासी संधी मिळावी यासाठी त्यांची इतर आगारात बदली ली जाते.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SC Reservation Controversy : महाराष्ट्रात पुन्हा 'रिडल्स' आंदोलनासारखा भडका उडणार? SC आरक्षण उपवर्गीकरणावरून माजी आमदाराचा थेट इशारा, 'भीम आर्मी'ही मंत्रालयात

Latest Marathi News Live Update : भंडारा-गोंदिया विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांची माघार; आता थेट तिरंगी सामना

Pune Bangalore Highway Traffic : पुणे-बंगळूर महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी; बावधन येथे अवजड वाहन बंद पडल्याने १० किमीपर्यंत रांग

Viral Video: रस्त्यावर दिसलं अनोखं दृश्य! बकरीवर बसून शाळेत जाणाऱ्या मुलाचा व्हिडिओ तुफान व्हायरल

Navi Mumbai: वारंवार अत्याचार, नग्न फोटो व्हायरल करत...; शिंदे गटाच्या नेत्याकडून विवाहितेचा छळ, गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT