पुणे

छापासत्रात 80 गॅस टाक्‍या जप्त 

सकाळवृत्तसेवा

निगडी - संत तुकारामनगर, काळेवाडी, रहाटणी, चिंचवड येथील व्यावसायिकांवर अन्नधान्य वितरण विभागाने छापे टाकले. घरगुती गॅसच्या टाक्‍यांचा व्यावसायिक कारणासाठी वापर करणाऱ्यांवर ही कारवाई करून 80 गॅस टाक्‍या जप्त केल्या.  अन्नधान्य वितरण विभागाने सलग दोन दिवस ही कारवाई केली. 

व्यावसायिक गॅस टाक्‍यांऐवजी व्यावसायिक घरगुती गॅसच्या टाक्‍या वापरल्या जात असल्याच्या तक्रारी पुरवठा विभागाकडे येत होत्या. या पार्श्‍वभूमीवर पुरवठा विभागाने शहराच्या विविध ठिकाणी छापे टाकले. अन्नधान्य वितरण अधिकारी रघुनाथ पोटे व परिमंडळ अधिकारी दिनेश तावरे, वाकड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अभिजित जाधव, पुरवठा अधिकारी गणेश सोमवंशी, प्रशांत ओव्होळ व बबन माने यांच्या पथकाने ही कारवाई केली. तसेच सुनील कास्टेवाड, संतोष लिमकर, श्रीराम गायकवाड, बाबासाहेब ठोंबरे व गणपत राजे तसेच पोलिस शिपाई ए. एस. जाधव, हवालदार एस. सी. पन्हाळे, व्ही. टी. खोमणे, बी. ए. लाळगे व चिंचवड पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक एस. टी. ढवळे यांच्या भरारी पथकाने ही कारवाई केली. 

बेकादा गॅस टाक्‍या वापरणाऱ्यांवर कारवाईचे आदेश वरिष्ठ कार्यालयाकडून दिल्याने ही कारवाई करण्यात आली. पिंपरी-चिंचवड शहरात जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार बेकायदा गॅस टाक्‍या वापरणाऱ्या व्यावसायिकांवर यापुढेही कारवाई करण्यात येईल. 
दिनेश तावरे, परिमंडळ अधिकारी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Mine Collapse : सोन्याच्या खाणीत मोठी दुर्घटना; ३० कामगारांचा मृत्यू, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले

Pune Ring Road: पुणेकरांना वाहतूक कोंडीतून मिळणार दिलासा! रिंगरोडच्या पूर्व विस्ताराला मंजुरी; ३१.८ किमी मार्गावर ४ बोगदे, १८ उड्डाणपूल

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा; सात जिल्ह्यांना येलो अलर्ट

Pune Crime: पुण्यातील पिंपळवंडीत चिमुकलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या; पोलिसांना चकवा देणाऱ्या शेजाऱ्याला बेड्या

Corporator Daughter: भाजप नगरसेविकेच्या २३ वर्षीय मुलीने संपवले आयुष्य, परीक्षेच्या आदल्या दिवशी उचलले टोकाचे पाऊल

SCROLL FOR NEXT