पुणे

चार महिन्यांत केवळ सल्लागारच 

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - स्मार्ट सिटी योजनेतून नवी मुंबई महापालिका बाहेर पडल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेचा वर्षभरापूर्वी समावेश झाला; मात्र अंतिम फेरीत पात्र होऊन समावेशाची अधिकृत घोषणा जून 2017 मध्ये झाली. गेल्या चार महिन्यांमध्ये फक्त प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्यासाठी कार्यवाही झाली आहे. अद्याप प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून निधीची प्रतीक्षा आहे. 

पुढील दोन महिन्यांमध्ये पॅन सिटी आणि मॉडेल वॉर्डचे सर्वेक्षण करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. त्याशिवाय या प्रकल्पाचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करावा लागणार आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात नागरिकांसाठी उपयुक्त सुविधा करण्यावर भर असणार आहे. हा प्रकल्प एकूण एक हजार 149 कोटी रुपयांचा असेल. या प्रकल्पांतर्गत महापालिकेला पुढील चार वर्षांमध्ये केंद्र व राज्य सरकारकडून निधी मिळणार आहे. 

आज बैठक 
स्मार्ट सिटीसाठी स्थापन झालेल्या एसपीव्ही कंपनी संचालक मंडळाची दुसरी बैठक शुक्रवारी (ता. 10) सकाळी 11 वाजता होणार आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या दालनात ही बैठक होईल. नगरविकास खात्याचे प्रधान सचिव डॉ. नितीन करीर हे अध्यक्षस्थानी असतील. बैठकीत पॅन सिटी कॉम्पोनंट प्रकल्पाचा आढावा, स्मार्ट सिटीसाठी नियुक्त करावयाच्या प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराबाबत चर्चा होईल. त्याशिवाय, कंपनीसाठी कॅगचे लेखापरीक्षक नियुक्त करण्याचा प्रस्ताव आहे. शहराचे वाहतूक नियोजन, स्मार्ट रस्ते, नगर नियोजन, टोपोग्राफी सर्वेक्षण आदी मुद्यांबाबत बैठकीत विस्तृत चर्चा अपेक्षित आहे. 

स्मार्ट सिटी योजनेचे नेमके स्वरूप 
* स्मार्ट सिटी प्रस्तावात प्रामुख्याने क्षेत्रनिहाय विकास (एरियाबेस डेव्हलपमेंट) आणि 
पॅन सिटी हे दोन प्रमुख घटक 
* एकूण 1149 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचा समावेश 
* क्षेत्रनिहाय विकासासाठी 593 कोटी 67 लाख इतका खर्च अपेक्षित 
* पॅन सिटीअंतर्गत 555 कोटी 53 लाख इतक्‍या खर्चाचे नियोजन 
* अभियानाचे मुख्य घटक : रेट्रोफिटिंग, पुनर्विकास, हरित क्षेत्र विकास (ग्रीन फिल्ड डेव्हलपमेंट) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Governor: महागाई वाढणार? पेट्रोल-डिझेलबाबत गव्हर्नर मल्होत्रा यांचे मोठे वक्तव्य; नेमके काय म्हणाले?

ENG vs NZ: लॉर्ड्स कसोटीत फलंदाजांची उडाली त्रेधातिरपीट! पहिल्याच दिवशी पडल्या तब्बल १६ विकेट्स; VIDEO

तुमच्या आरोग्याशी खेळ! कचऱ्याच्या समस्येमुळे महाराष्ट्राची पीछेहाट; पर्यावरणाबाबत सरकार उदासीन का?

Karnataka Cabinet Row : मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारताच डी.के शिवकुमार यांना मोठा झटका, ज्येष्ठ मंत्र्याचा राजानीमा; नेमकं काय घडलं?

Tamhini Ghat Accident : ताम्हिणी घाटात काळजाचा ठोका चुकवणारी घटना! शौचास गेलेली व्यक्ती पाय घसरून दरीत कोसळली, डोळ्यांदेखत वडील नाहीसे झाल्याने मुलाने...

SCROLL FOR NEXT