पुणे

पाणी पुरवठ्यावरून "स्थायी'त खडाजंगी 

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - निगडी-प्राधिकरणात विस्कळित पाणीपुरवठ्यावरून स्थायी समिती सभेत गुरुवारी (ता. 7) सदस्यांनी महापालिका प्रशासनावर टीकेची झोड उठवली. आठवडाभरात याबाबत तोडगा न निघाल्यास "अ' क्षेत्रीय कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा सदस्य राजू मिसाळ यांनी दिला. 

प्राधिकरण परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून होत असलेल्या विस्कळित पाणीपुरवठ्याबाबत मिसाळ यांनी विषय मांडला. ते म्हणाले, ""पूर्वी परिसरामध्ये दररोज 25 दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा होत होता. आता 20 दशलक्ष लिटर इतका होत आहे. उन्हाळ्यात तर ही पाणी समस्या आणखी बिकट होऊ शकते.'' पाण्याच्या टाक्‍या पुरेशा भरत नसल्याने निगडी-प्राधिकरण परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत, असे अमित गावडे, वैशाली काळभोर म्हणाले. 

पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी याबाबत नुकतीच बैठक घेतली. पाणी वितरणात असलेल्या अडचणींमुळे हा प्रश्‍न जाणवत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ही समस्या सोडविण्यासाठी एमआयडीसीकडून 5 ते 6 दशलक्ष लिटर पाणी घेण्याचे नियोजन आहे. तसेच, काही भागांमध्ये सकाळी पाणी सोडण्याऐवजी सायंकाळी सोडण्याचे नियोजन आहे. 
- शैलजा मोरे, उपमहापौर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Milk Union : पुणे दूध संघातील गैरव्यवहारांची चौकशीची टिळेकरांची मागणी; कारवाई करण्याचे मंत्री अतुल सावे यांचे आश्वासन

Alandi News : पुरामुळे नुकसान झालेल्या नागरी सुविधांसाठी आळंदीला 10 कोटींचा निधी मंजूर

Latest Marathi News Update : आयशर ट्रक अन् एसटीच्या धडकेत चौघे गंभीर, ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Ashadhi Wari Health Services: कमला नेहरू रुग्णालयात १० अतिदक्षता खाटा राखीव; वारकऱ्यांच्या आरोग्यसेवेसाठी महापालिकेचा आरोग्‍य विभाग सज्ज

Pune News : धायरी फाटा उड्डाणपुलाला भेग; पूल सुरक्षित असल्याचा प्रशासनाचा खुलासा

SCROLL FOR NEXT