पुणे

कोंडीमुक्तीसाठी सक्षम ‘पार्किंग पॉलिसी’

CD

पिंपरी, ता. २० ः पिंपरी चिंचवड शहरातील वाहनांची वाढती संख्या आणि वाहतूक कोंडीवर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी सक्षम पार्किंग पॉलिसी (वाहनतळ धोरण) तयार करण्याचे काम सुरू आहे. याबाबत महापालिका बीआरटीएस विभागाने स्थायी समिती समोर सादरीकरण केले. महापालिका आणि पोलिस प्रशासन यांच्या संयुक्त समन्वयाने पार्किंग धोरण लवकरच अंमलात आणले जाणार आहे.
शहरात राबविण्याचे नियोजन असलेल्या पार्किंग पॉलिसीचे सविस्तर सादरीकरण बीआरटीएस विभागाने केले. यामध्ये धोरणाची तांत्रिक आणि व्यावहारिक बाजू मांडली. त्यावर सविस्तर चर्चा झाली. पार्गिंक धोरण अधिक लोकाभिमुख आणि त्रुटीरहित करण्यासाठी काही महत्त्वाच्या ठिकाणी आवश्यक दुरुस्त्या व सुधारणा करण्याच्या सूचना स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी दिल्या. त्यांचा समावेश करून नवीन पार्किंग धोरण प्रभावीपणे आणि लवकरच अंमलात आणले जाणार आहे. त्यात आधुनिक तंत्रज्ञान व व्यावहारिक उपायांचा समावेश केला जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. बैठकीला सहशहर अभियंता बापूसाहेब गायकवाड, कार्यकारी अभियंता सुनील पवार आदी उपस्थित होते.

पादचारी, सायकलस्वारांना प्राधान्य
पिंपरी चिंचवडमधील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सोडवण्यासाठी शाश्वत आणि शिस्तबद्ध यंत्रणा उभारण्याच्या उद्देशाने नवीन पार्किंग धोरण राबविले जाणार आहे. बीआरटीएस विभागाने त्याबाबत सादरीकरण केले आहे. त्यात काही सुधारणा सूचविल्या आहेत. वाहतूक सुरळीत करणे, पादचारी आणि सायकल चालवणाऱ्यांनाही सुरक्षित रस्ते मिळवून देणे हा पॉलिसीचा प्रयत्न आहे. ऑन-स्ट्रीट आणि ऑफ-स्ट्रीट पार्किंगचे दर ठरवताना सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक भार पडणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाईल. सर्व तांत्रिक त्रुटी दूर करून ‘आपल शहर, आपली शिस्त’ या भावनेतून पार्किंग धोरण नागरिकांच्या सेवेत आणले जाईल, असे स्थायी समिती सभापची अभिषेक बारणे यांनी सांगितले.

नवीन पार्किंग पॉलिसीनुसार...
- प्रत्येक भागाच्या गरजेनुसार ‘एरिया बेस्ट पार्किंग’ व्यवस्था विकसित केली जाईल
- नागरिकांच्या सोयीसाठी ‘कलर कोडिंग सिस्टीम’ असेल
- रस्त्यालगत घर असणाऱ्यांना विशेष ‘पार्किंग परमिट’ दिले जाईल
- मुख्य रस्त्यांवर जड वाहनांची पार्किंग पूर्णपणे बंद असेल
- जड वाहनांसाठी शहराबाहेर जागा निश्चित केली जाईल
- अनावश्यक पार्किंग टाळण्यासाठी थेट सॅटेलाईटद्वारे जागांची जपडताळणी केली जाईल
- पार्किंग व्यवस्थेवर देखरेखीसाठी स्वतंत्र ‘पार्किंग मॅनेजमेंट’ कक्ष असेल
- वाहनचालकांसह पादचारी, सायकलस्वारांसाठीही स्वतंत्र व सुरक्षित जागा निश्चित असेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Price: LPG गॅस सिलेंडर तब्बल 600 रुपयांनी स्वस्त! कुठे मिळतोय डिस्काउंट अन् कारण काय? जाणून घ्या

Thane Ring Metro : 1988 ची संकल्पना अखेर प्रत्यक्षात! भिवंडी, कल्याण अन् मुंबईचा प्रवास होणार अतिशय सोपा; ठाण्याच्या 'रिंग मेट्रो' प्रकल्पाचा रंजक प्रवास माहितीये का?

Bharat Gogawale on Manoj Jarange Patil : "कोणी ऐऱ्यागैऱ्याने त्याचे श्रेय घेऊन ठाण्याला आव्हान देऊ नये,”, भरत गोगावलेंचे मनोज जरांगेंवर थेट आरोप

Marathi News Live Updates : पक्ष फोडणाऱ्या टोळीचे मुख्य सूत्रधार ज्ञानेश कुमारच, त्यांचा तातडीने राजीनामा घ्या; उद्धव ठाकरे आक्रमक

Fertilizer Allocation System : आधार, सातबारा अन् पिकानुसार ठरणार खतांचा कोटा ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ प्रणाली; वाळवा पंचायत समितीत खत विक्रेत्यांना प्रशिक्षण

SCROLL FOR NEXT