पिंपरी, ता. २७ ः महापालिका विकास आराखड्यात (डीपी) दिघी, डुडुळगाव, तळवडे, मोशी, चोविसावाडी (चऱ्होली) गावांतील विविध रुंदीचे रस्ते नियोजित आहेत. यातील बहुतांश रस्ते इंद्रायणी नदीला समांतर असून, त्यांच्या निर्मितीसाठी भूसंपादन कार्यवाही गुरुवारपासून (ता. २७) सुरू झाली. बाधित मिळकतधारकांनी विकास हक्क प्रमाणपत्र (टीडीआर प्रमाणपत्र) किंवा चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) मिळण्याबाबत एक महिन्याच्या आत प्रकरण दाखल करावे. अन्यथा केवळ भूसंपादन कायद्यानुसार मोबदला दिला जाईल. अधिक माहितीसाठी महापालिकेतील नगररचना व विकास विभाग उपसंचालक कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.
महापालिका विकास आराखड्यातील रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी जागेचे भूसंपादन आवश्यक आहे. त्याची कार्यवाही जिल्हाधिकाऱ्यांकडील विशेष भूसंपादन अधिकारी कार्यालयामार्फत चालू आहे. त्याअंतर्गत रस्त्यांसाठीच्या जागेच्या मोजणीचे काम भूमी अभिलेख उपअधीक्षक कार्यालयामार्फत गुरुवारी (ता. २७) सुरू झाले. या रस्त्यांनी बाधित होणाऱ्या ज्या मिळकतधारकांनी प्रपत्र ‘अ’ व ‘ब’च्या माध्यमातून महापालिकेस ताबा दिला आहे, ज्यांनी ताबा दिलेला नाही, ज्यांनी महापालिकेकडे प्रकरण दाखल केले आहे, अशा सर्व मिळकतधारकांनी त्वरीत विकास हक्क प्रमाणपत्र किंवा चटई क्षेत्र निर्देशांक मिळण्याबाबत एक महिन्याच्या आत प्रकरण दाखल करावे. अन्यथा केवळ भूसंपादन कायद्यानुसार मोबदला देय होईल. याबाबतच्या अधिक माहितीसाठी महापालिकेतील नगररचना व विकास विभाग उपसंचालक कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.
गावनिहाय प्रस्तावित रस्ते
दिघी ः १२ व १५ मीटर रुंद रस्त्यासाठी सुमारे ७,३५० चौरस मीटर क्षेत्र
डुडुळगाव ः इंद्रायणी नदीलगतचा १८ मीटर रुंद रस्ता
तळवडे ः इंद्रायणी नदीलगतचा १२ व ३० मीटर रुंद रस्ता
मोशी ः इंद्रायणी नदीलगतचा १८ मीटर रुंद रस्ता
तळवडे ः कॅनबे चौक ते निगडी स्पाइन रस्ता जोडणारा १८ मीटर रुंद रस्ता
चोविसावाडी ः प्रस्तावित ९० मीटर रुंद रस्त्यासाठी भूसंपादन
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.