Crime_Marijuana 
पुणे

आळंदीत ऐन कार्तिकी वारीत गांजाविक्री; छाप्यात पोलिसांना सापडला तब्बल २५ किलो गांजा!

सकाळ वृत्तसेवा

आळंदी देवाची : कार्तिकी वारीमुळे आळंदीत संचारबंदी लागू आहे. यासोबत भर रस्त्यावर घुंडरे गल्लीच्या कोपऱ्यावर बॅरिगेटिंग करून पोलिसांचा खडा पहारा ठेवला. मात्र येथूनच अवघ्या पाचशे मीटर अंतरावरच एक महाभाग महिला ऐन वारीत गांजा विक्री करत असल्याचे पोलिसांना कळाले. आणि त्यानंतर पिंपरी पोलिस आयुक्तालयाच्या सामाजिक सुरक्षा पथकाने तिला अटक केली. छाप्यामधे एक लाख बारा हजार रूपयांची रोकड, साडे पंचवीस किलो गांजा आणि तेरा हजार रुपयांची विदेशी दारू आणि बियरच्या बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या. 

शहराच्या मध्यवर्ती भागात गेल्या काही वर्षांपासून खुलेआम गांजा विक्रीचा धंदा सुरू होता. याप्रकरणी अंबिका मारूती गरूड (वय-५५, रा.घुंडरे गल्ली) हिच्यावर आळंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

आळंदीत सध्या कार्तिकी वारी सुरू आहे. पोलिसांचा वाढीव बंदोबस्त शहरात असून ठिकठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. मंदिराकडे येणाऱ्या सर्व मार्गावर बॅरिगेट लावून रस्ते बंद केले. तरीही संचारबंदी असूनही अंबिका गरूड खुलेआम गांजा विक्री करत. स्थानिक पोलिसांना याबाबत खबर लागू नये, ही आश्चर्याची बाब म्हणावी लागेल. मात्र, पिंपरी पोलिस आयुक्तालयाच्या सामाजिक सुरक्षा विभागातील पोलिसांनी शुक्रवारी (ता.११) सायंकाळी छापा मारला.

छाप्यामधे चार लाख तीन हजार रुपयांचा सुमारे साडे पंचवीस किलो गांजा सापडला. आणि एक लाख बारा हजार रुपयांची रोख रक्कम सापडली. सोबत पावणे तेरा हजार रुपयांची विदेशी दारू आणि बियरच्या बाटल्याही सापडल्या. या कारवाईबाबत फिर्याद पोलिस हवालदार संदीप सोमनाथ गवारी यांनी दिली. अधिक तपास आळंदी पोलिस करत आहेत.  

संचारबंदीत वारकऱ्यांना वारीला येण्यास बंदी केली. मात्र एवढे पोलिस असूनही एवढ्या मोठ्या स्वरुपात गांजा विक्री चालू होती. याशिवाय आणखी काही ठिकाणी अवैधपणे दारूची विक्री होत आहे. गर्दुले आणि मद्यपी मात्र मोठ्या प्रमाणात वावरत आहेत. कार्तिकी वारीत संचारबंदीत ही अवस्था, तर इतरवेळी आळंदीत काय धंदे चालत असतील कल्पनाच करायला नको.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी ► क्लिक करा 

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Legislative Estimate Committee: यवतमाळमध्ये अंदाज समितीच्या मागावर ‘खबऱ्यांचे नेटवर्क’? वाहनांचे फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल

Amravati Food Safety Action: अमरावतीत घाणेरड्या वातावरणात नूडल्स निर्मिती; कुत्रे-मांजरांचा वावर उघड, दोन गृहउद्योगांचे परवाने तातडीने निलंबित

Marathi News Live Updates: पाषाण-बावधन रस्त्यावर भरधाव कारची धडक, सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू

Simple Footpath Wedding: अमरावतीत उड्डाणपुलाखाली फुटपाथवर रंगला साधेपणाचा अनोखा विवाहसोहळा; सोशल मीडियावर कौतुकाची लाट

Successful National Lok Adalat: गंगापूर जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत यशस्वी; १०७ प्रकरणांचा तडजोडीने निपटारा, ८० लाख रुपयांची वसुली

SCROLL FOR NEXT