पुणे

सहा उर्दू शाळांना मंजुरी

आशा साळवी

पिंपरी - महापालिकेच्या अखत्यारीत असलेली एकमेव उर्दू शाळा कमी पडत असल्याने चार वर्षांपूर्वी शहरात सहा उर्दू माध्यमिक शाळा सुरू करण्यात आल्या. त्यासाठी काही संस्थांनी पुढाकार घेतला. मात्र राज्य सरकारची मंजुरी नसल्याने या शाळांतील विद्यार्थ्यांना नोंदणी क्रमांक मिळत नव्हता; तसेच शिक्षकांना वेतनही मिळत नव्हते. महापालिकेने परवानगीसाठी पाठपुरावा केल्यावर अखेर सरकारने या शाळांना मान्यता दिली. शाळांचा खर्च या संस्थांना स्वखर्चातून करावा लागणार आहे. 

महापालिकेच्या माध्यमिक उर्दू विभागाच्या सात शाळा आहेत. आकुर्डीतील उर्दू विभागाच्या एकाच शाळेला मान्यता आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मागणीनंतर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची मान्यता घेऊन चार वर्षांपूर्वी खराळवाडी, कासारवाडी, भोसरी, लांडेवाडी, नेहरूनगर, रुपीनगर, थेरगाव येथे या शाळा सुरू झाल्या. त्यांना अद्याप शासकीय मान्यता नव्हती. मान्यता नसल्याने या शाळा पहिल्यापासूनच दुर्लक्षित राहिल्या होत्या. या शाळांमध्ये दरवर्षी तासिका तत्त्वावर उर्दू माध्यमांच्या शिक्षकांची भरती होती. मराठी माध्यमांच्या मुख्याध्यापकांनाच उर्दू शाळांच्या प्रभारीपदाचा अतिरिक्‍त कारभार पाहावा लागत होता. उर्दू व मराठी अशा द्विभाषिक शाळा एकाच मुख्याध्यापकाला सांभाळाव्या लागत असल्याने मोठी अडचण व्हायची. दरवर्षी प्राथमिक शाळेतून उत्तीर्ण झालेल्या आठवी, नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्‍न निर्माण व्हायचा, ही गैरसोय दूर करण्यासाठी प्रशासन अधिकारी बी. एस. आवारी यांनी सरकारकडे याविषयी वारंवार पाठपुरावा केला. त्यानुसार या सहा शाळांना स्वउत्पन्नातून आणि राज्य सरकारवर प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष कोणत्याही प्रकारचे आर्थिक दायित्व न येता शिक्षण देण्याची परवानगी सरकारने दिली आहे. तसे आदेश अवर सचिव आ. ना. भोंडवे यांनी दिले आहेत.

दहावी बोर्ड परीक्षेला बसण्यासाठी बोर्डाचा सांकेतिक क्रमांक असणे अनिवार्य असतो. विद्यार्थ्यांच्या नोंदी बोर्डाकडे होणे आवश्‍यक असतात. मात्र मान्यता नसल्याने या विद्यार्थ्यांना महापालिकेच्या आकुर्डी माध्यमिक शाळेच्या ‘युडायस नंबर’वरून परीक्षा द्यावी लागत होती. आता या शाळांना मान्यता मिळाल्यामुळे यंदा दहावी बोर्ड परीक्षेला बसण्यासाठी बोर्डाचा सांकेतिक क्रमांक मिळणार असून, विद्यार्थ्यांच्या नोंदी बोर्डाकडे होतील. यातून या विद्यार्थ्यांची फरफट दूर होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुकाराम मुंढेंना राजकारणात येण्याची ऑफर कुणी दिली? एका दिवसासाठी मुख्यमंत्री झाले तर काय करणार? काय म्हणाले मुंढे?

Raigad Heavy Rain : पाऊस आला धावून, अन् रस्ते गेले वाहून; रायगड जिल्ह्यात रस्ते व महामार्गांची दूरवस्था प्रवाशांचा जीव धोक्यात

IND vs ENG 3rd T20I: भारतीय संघाने टॉस जिंकला! ज्याच्यामुळे मागची मॅच हरली, त्याला केले संघाबाहेर; बघा कशी आहे Playing XI

Vasai Virar Local Stop : पावसापुढे रेल्वेची पुन्हा शरणागती; १२ तासांत दुसऱ्यांदा वसई-विरार लोकल ठप्प! लाखो प्रवासी अडकले

Nagpur Crime : ‘एआय’ तंत्रज्ञानाने शोधला निर्घृण मारेकरी; वृद्धेवरील अत्याचार व खुनाचा झाला उलगडा

SCROLL FOR NEXT