भोसरी - उड्डाण पुलाखाली फेरीवाल्याने भांड्यांचे थाटलेले दुकान. 
पुणे

भोसरी उड्डाण पूल दारूड्यांचा अड्डा

संदीप घिसे

पिंपरी - भोसरी उड्डाण पुलाखाली भंगारातील वाहने, कचरा, फेरीवाल्यांचे अतिक्रमण, बेशिस्त पार्किंग, मोकाट जनावरे या समस्या तर आहेतच. परंतु येथील काही फेरीवाल्यांकडून दारूची विक्री केली जाते आणि पुलाखालीच भरदिवसा दारू पिण्याचा हा उद्योग सुरू असतो. गेले कित्येक महिने सुरू असलेला हा प्रकार पोलिसांना माहिती नसावा, या बाबत आश्‍चर्य व्यक्‍त केले जात आहे. 

नागरिकांना सुरक्षित रस्ता ओलांडता यावा, यासाठी पुलाखाली झेब्रा क्रॉसिंग करण्यात आले आहे. मात्र झेब्रा क्रॉसिंगवरच अवजड वाहने उभी केली जातात. अशा वाहनांवर कारवाई करणे सोडा, परंतु याच अवजड वाहनांसमोर वाहतूक पोलिस उभे असतात. मोकाट जनावरे वाहतुकीला अडथळा करीत असतात. मात्र प्रशासनाला ती जनावरे कधीच दिसत नाहीत. फेरीवाल्यांनी फक्‍त पुलाखालची जागाच नाही तर रस्ताही व्यापला आहे. यामुळे जेमतेम एक अवजड वाहन जाऊ शकेल एवढीच जागा शिल्लक राहते. फेरीवाल्यांमुळे पुणे-नाशिक महामार्गाला भोसरी पुलाखाली मंडईचे स्वरूप आले आहे. या भागात पोलिसांचा राबता राहावा यासाठी पोलिस चौकी बांधली. मात्र त्यातील टेबल, खुर्ची चोरीला गेल्याचे काही नागरिकांनी सांगितले.
 

समस्या
 हातगाडीवाल्याकडून दारूची विक्री
 ना-दुरुस्त आणि भंगारातील वाहने पडून
 फेरीवाल्यांकडून अतिक्रमण
 स्वच्छतागृहाच्या अभावामुळे ठिकठिकाणी अस्वच्छता
 मोकाट जनावरे, बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतूक कोंडी

उपाययोजना
 दारू विक्रेत्यांवर कारवाईची आवश्‍यकता
  पे-अँड पार्क केल्यास महापालिकेस महसूल मिळेल
 हॉकर्स झोनमध्ये पुनर्वसन करण्याची गरज
 बेशिस्त वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई व्हावी
 पुलाखाली आणखी दोन ठिकाणी स्वच्छतागृहाची उभारणी व्हावी

नागरिकांच्या प्रतिक्रिया
लहान मुलांना हाताशी धरून सहज रस्ता यावा, अशी स्थिती पुलाखाली राहिलेली नाही. पूल बांधूनही समस्या सुटली नाही तर उलट वाढलेलीच आहे. येथील समस्या रौद्र रूप धारण करण्याची वाट प्रशासन पाहात आहे का?
- प्रियदर्शनी हिंगे 
 
कुटुंबासह जात असताना अचानक मोकाट जनावरे मध्ये आल्याने मला अपघात झाला आहे. येथील फेरीवाल्यांपुढे तर महापालिकेने लोटांगण घातले आहे. पोलिसांनीही येथील समस्येकडे असेच दुर्लक्ष केले, तर यापुढील काळात टेबल, खुर्च्या लावून ओपनबारही सुरू होईल.
- मारुती भिलारे 

पदाधिकारी म्हणतात...
दारूड्यांवर पोलिस आणि कारवाई करणे गरजेचे आहे. कर्मचारी कमी असल्याचे कारण महापालिका प्रशासन देते. यामुळे पूल नेमका कोणसाठी बांधला आहे, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.
- अजित गव्हाणे, नगरसेवक

गेल्या पंचवार्षिकपासून पोलिस आणि महापालिकेकडे मी सर्वाधिक लेखी तक्रारी केल्या आहेत. रिकाम्या जागी हॉकर्स झोनमध्ये फेरीवाल्यांचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे.
- ॲड. नितीन लांडगे, नगरसेवक

अधिकारी म्हणतात...
सध्या माझ्याकडे ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयाचा प्रभारी कार्यभार आहे. मात्र या परिसरातील फेरीवाल्यांवर महापालिका नियमित कारवाई करते. येथील फेरीवाल्यांकडून अनुचित प्रकार होत असल्याचे आढळल्यास त्यावर कडक कारवाई केली जाईल.
- योगेश कडुसकर, प्रभारी इ क्षेत्रीय अधिकारी

अशा प्रकारे कोणी दारू विक्री करीत असेल, तर नक्‍कीच त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच पुलाखाली दारू पिणाऱ्यांवरही कारवाई केली जाईल.
- संपतराव भोसले, वरिष्ठ पोलिस निरीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Leaders Join Congress : ममता बॅनर्जींना मोठा धक्का! १०० हून अधिक नेते-कार्यकर्त्यांनी पक्ष सोडला; यावेळी भाजप नाही तर कॉंग्रेसमध्ये प्रवेश

आजचे राशिभविष्य - 29 सप्टेंबर 2026

आरोग्य‘चेतना’ : स्पायनल ट्युमरची अत्याधुनिक शस्त्रक्रिया

Maharashtra Weather : पावसाची पुन्हा एन्ट्री! राज्यातील ८ जिल्ह्यांना येलो अलर्ट; तुमच्या भागात कसे असेल हवामान ?

US-China Trade Deal : अमेरिका-चीन ट्रेड वॉरला ब्रेक! ६० अब्ज डॉलरच्या व्यापारावर मोठा निर्णय, भारताची चिंता वाढली ?

SCROLL FOR NEXT