पुणे

म्हाडा कॉलनी-मोरवाडीतील बसशेड गायब

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - पिंपरी गावातील स्वच्छतागृहांपाठोपाठ आता म्हाडा कॉलनी - मोरवाडी मार्गावरील एका टोलेजंग व्यापारी इमारतीशेजारील बसथांब्याचे शेड रात्रीतून गायब झाले. सकाळपासून थांबा जागेवर नसल्याने दिवसभर प्रवाशांकडून त्याची शोधाशोध सुरू होती. गेल्या काही महिन्यात महापालिकेच्या ‘प्रॉपर्टी’वर डल्ला मारण्याचे प्रकार सुरू असताना, महापालिका मात्र ‘मूग गिळून गप्प बसली’ असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. दुसरीकडे बसथांबे पळवून नेण्याचे प्रकार पुन्हा सुरू झाल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.

मासुळकर कॉलनी - अजमेरा कॉलनी मार्गावरून मोरवाडीकडे येताना म्हाडा कॉलनी -मोरवाडी कॉर्नरवर उजव्या बाजूस गेली अनेक वर्षे हा थांबा प्रवाशांना सेवा देत होता. तसेच या थांब्यावरील जाहिरातींमधूनही पीएमपीला दरवर्षी चांगले उत्पन्न मिळत होते. असा उपयोगी बसथांबा अचानक पळवून नेल्याच्या प्रकारामागील गौडबंगाल काय? याची चर्चा प्रवाशांत होती. बस थांबा शेड नसले, तरी नेहमीप्रमाणे पीएमपीएमएल बस त्या ठिकाणी थांबत असल्याचे प्रवाशांनी सांगितले. बसथांबा हलविण्यासंदर्भात कोणाची तक्रार अर्ज नसल्याचे समजते; परंतु याठिकाणी बसथांबा हटवून एक नवीन हॉटेल थाटल्याचे दिसते. कारण, मॉल, व्यावसायिक कार्यालये, दुकाने यांच्या समोरील बसथांबे गायब होण्याचे अनेक प्रकार यापूर्वी घडले आहेत. तसेच, काही दिवसापूर्वी नेहरूनगरमधील स्वच्छतागृहदेखील अशाच प्रकारे राजकारणी मंडळीच्या आशीर्वादाने गायब झाले आहे. याच प्रकारातून ‘त्या’ नव्या हॉटेलसाठी म्हाडा कॉलनी - मोरवाडी कॉर्नरवरील बस थांबा गायब केल्याचे नागरिकांमध्ये चर्चा रंगलेली आहे. मात्र, अशा प्रकारांकडे महापालिकेने नेहमीप्रमाणे डोळेझाकपणा केल्याचे दिसते.

दोन लाख रुपयांचा थांबा 
पिंपरी- चिंचवड शहरात लाखो रुपये खर्च करून ठिकठिकाणी आधुनिक सुसज्ज स्टीलचे बस थांबा शेड उभारले आहेत. एका स्टील थांब्याची किंमत सुमारे सव्वादोन लाख रुपये आहे. एका प्रभागातील एकेका नगरसेवकाला दोन थांबे शेड उभारण्याची परवानगी आहे. त्यानुसार शहरात २५६ बस थांबे उभारले आहे. म्हाडा कॉलनी- मोरवाडी मार्गावर उजव्या बाजूला एकही बस थांबा सद्य:स्थितीत नाही, परंतु डाव्या बाजूला गरज नसताना काही अंतरावरच दोन नवे बस थांबा शेड उभारलेली आहेत.

नागरिकांची गैरसोय होईल, असे काही आम्ही करणार नाही. बस थांबा काढण्याविषयी माझी कोणतीही मागणी नव्हती. महापालिका अधिकाऱ्यांकडे विचारणा करतो.
- केशव घोळवे, नगरसेवक  

गरज नसल्याने या प्रभागातील काही नगरसेवकांनी बस थांबा काढण्याची मागणी केली होती. त्यामुळे महापालिकेने तो काढून जमा केला आहे.
- बी. एम. शेटे, कनिष्ठ अभियंता महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

From Cow Dung to Clean Fuel: एलपीजीच्या वाढत्या खर्चाला गावकऱ्यांचा देसी जुगाड; ११० महिलांच्या घरात बायोगॅस, शेणापासून गॅस अन् खत

Beetroot Oats Appe: बीट न खाणारी मुलेही मागून खातील; न आंबवता बनवा रक्त अन् ताकद वाढवणारे इन्स्टंट अप्पे!

ST विद्यार्थ्यांसाठी 'पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना'; विविध कोर्सेससाठी १ लाखांपर्यंत आर्थिक मदत! काय आहे अर्जाची संपूर्ण पद्धत?

Viral Digital Didi: शिकवण्याची भन्नाट पद्धत! खाजगी शाळा सोडून पालकांची अंगणवाडीकडे रांग, डिजिटल दीदीच्या यूट्यूब चॅनेलला लाखो व्ह्यूज

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २९ ऑगस्ट २०२६ ते ४ सप्टेंबर २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT