पुणे

काळ्या बाजारातील स्वस्त धान्याची 390 पोती जप्त

रवींद्र जगधने

दोघांना अटक, जिल्हा पुरवठा विभागाची कारवाई 

पिंपरी - काळ्या बाजारात जाणारी स्वस्त धान्य गव्हाची 390 पोती पुरवठा विभागाने जप्त केली आहेत. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी दोघांना अटक केली. धान्याची बाजारातील किंमत दोन लाख 20 हजार इतकी असून 20 लाखांचा ट्रकही जप्त केला आहे. 

स्वस्त धान्य दुकान चालक भावेश लक्ष्मीकांत आगरवाल (वय 32, रा. पूजा पॅलेस, फ्लॅट नं.7, अजमेरा, पिंपरी) आणि ट्रक चालक रंजन राजाराम सोनकर (वय 40, रा. बरेठलर खुर्द-खजुहा, जि. फत्तेपूर, उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याबाबत पुरवठा निरीक्षक मिलिंद सदाशिव क्षीरसागर (वय 51, रा. शिवाजी पार्क, चिंचवड) यांनी फिर्याद दिली. 

मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट एकचे पोलिस निरीक्षक कापरे यांनी संशयावरून पिंपरीतील अंबिका वजन काट्याजवळुन 390 पोती गव्हाने भरलेला ट्रक (एम.एच 14 डी.एम. 9339) हा ताब्यात घेतला. चालकाकडे चौकशी केली असता, गहू शासकीय असून तो स्वस्त धान्य (दुकान परवाना क्र.फ-चार) या दुकानातील असल्याचे उघड झाले. त्यामुळे आरोपींवर जीवनावश्‍यक वस्तू अधिनियम कायदा कमल तीन व चार अनुसार पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

राज्याचे अन्न धान्य व ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांच्या पुण्यातच शिधापत्रिकाधारकांसाठी वितरित करण्यात येणाऱ्या धान्याचा मोठा काळाबाजार होत असल्याचे समोर येत आहे. मागील आठवड्यात मुंढव्यात धान्य काळ्याबाजाराचा प्रकार उघडकीस आला होता. दरम्यान, स्वस्त धान्य परवाना कोणासही देता येत नाही. मात्र, याप्रकणात सदर परवाना बी. एम. भिलारे यांच्या नावावर असल्याचे उघड झाले. खात्याचे पुरवठा निरीक्षक नियमित दुकानांना भेटी देतात. त्यांच्या ही बाब ध्यानात आली असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे संबंधित पुरवठा निरीक्षकास निलंबित करण्याची मागणी भिमशाही संघटनेचे अध्यक्ष राम पालखे यांनी अन्न नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्याकडे केली आहे. 

खरे लाभार्थी कोण? 
स्वस्त धान्य दुकानांच्या आधारे गरिबांना स्वस्त धान्य देण्याची जबाबदारी सरकारची आहे. मात्र, असे धान्य काळयाबाजाराचे प्रकार उघडकीस येत आहेत. धान्य मिळत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. दुकानदार मात्र, मोठ्या प्रमाणात शासकीय गहू आणि तांदळाचा काळा बाजार करत आहेत. त्यामुळे स्वस्त धान्याचे खर लाभार्थी कोण? असा प्रश्‍न नागरिक विचारत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Mumbai Expressway : मिसिंग लिंक प्रकल्प अंतिम टप्प्यात; महामार्गावरील वाहतूक कोंडी फुटण्यास आणखी तीन महिने प्रतीक्षा

Pune Wildlife News : शिरूर तालुक्यात बिबट्याचे तीन बछडे आढळल्याने उडाली खळबळ; शेतकरी, ऊसतोड मजुरांमध्ये भीतीचे वातावरण

Pune-Mumbai Traffic Jam : ‘एसटी’ला पंधरा लाखांचा फटका, द्रुतगती मार्गावरील कोंडीचा परिणाम; गुरुवारी ६६ शिवनेरी बस रद्द

Latest Marathi News Live Update : विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी संभाजी भगत यांची निवड

Mumbai-Pune Expressway Traffic jam : द्रुतगतीवरील कोंडी धोक्याची घंटा, महामार्गावर आपत्ती व्यवस्थापनाची कसोटी; यंत्रणांतील मर्यादा उघड

SCROLL FOR NEXT