पुणे

डेअरी फार्म येथील नियोजित उड्डाण पुलाचे काम लवकरच

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - महामार्ग व पिंपरीगाव यांना जोडणाऱ्या डेअरी फार्म येथील उड्डाण पुलाचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी शुक्रवारी महापालिका आयुक्तांकडे केली. येत्या तीन महिन्यांत हे काम सुरू करण्याचे आश्‍वासन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले. 

पिंपरी विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांसंदर्भात महापालिकेमध्ये चाबुकस्वार व आयुक्तांची बैठक झाली. शहर अभियंता अंबादास चव्हाण, सहशहर अभियंता राजन पाटील यांच्यासह विविध खात्यांचे प्रमुख अधिकारी, नगरसेवक अमित गावडे, प्रमोद कुटे, मीनल यादव बैठकीला उपस्थित होते. 

चाबुकस्वार म्हणाले, ‘‘पुणे-मुंबई महामार्गावरून थेट पिंपरी गावाला जोडणाऱ्या मिलिटरी डेअरी फार्म येथे रेल्वे उड्डाण पुलाच्या उभारणीची मागणी गेली १२ वर्षे प्रलंबित आहे. ५० कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. उड्डाण पूल उभारण्यासाठी जागा ताब्यात घ्यावी लागेल. त्यापोटी संरक्षण खात्याला पालिकेने शुल्कही दिले आहे. संरक्षक भिंत व फार्म विकसित करण्याच्या लष्कराच्या मागण्या तत्त्वतः मान्य करून तातडीने हा विषय मार्गी लावण्याचे आयुक्तांनी मान्य केले.’’ 

ते म्हणाले, ‘‘आकुर्डी येथील खंडोबा माळ चौकात वाहतुकीची कोंडी होते. पादचाऱ्यांसाठी महामार्गावरील संत तुकारामनगर येथील स्कायवॉक हलवून तो आकुर्डीला स्थलांतरित करण्याचे या वेळी ठरले. पिंपरी गावातील सेक्‍टर क्रमांक एक आणि दोन येथे भव्य क्रीडांगण उभारणीसाठी तातडीने जागा ताब्यात घेणे, प्राधिकरणातून चिंचवड स्टेशनला पांढरकर चाळ मार्गे जोडणाऱ्या रस्त्याचे काम, पीएमपीच्या आरक्षित जागा त्यांना नको असल्यास त्या जागा महापालिकेने ताब्यात घेणे याबाबत चर्चा झाली. त्या कामांचा अहवाल चार दिवसांत सादर करण्याचे आदेश आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले.’’ 

कॅम्पातील वाहतुकीवर तोडगा हवा
पिंपरी कॅम्पातील वाहतुकीवर पडणारा ताण लक्षात घेऊन काळेवाडी ते आंबेडकर कॉलनी (रिव्हर रोड) असा पवना नदीवर पूल उभारण्यासाठी सर्व्हे करण्याची सूचना आमदार गौतम चाबुकस्वार यांनी या वेळी केली. असा पूल झाल्यास रहाटणी, काळेवाडी, पिंपळे सौदागर, वाकड परिसरातील नागरिकांची सोय होईल, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mushfiqur Rahim Retirement: बांगलादेशचा दिग्गज क्रिकेटपटू मुशफिकूर रहीमची निवृत्तीची घोषणा; इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका ठरणार अखेरची

Israel Political Crisis: इस्रायलमध्ये सत्तास्थापनेचा पेच कायम; नेतान्याहूंची नवी खेळी, आयझेनकोट यांना काय दिली ऑफर?

Marathi News Live Updates: विनोद कांबळीला एकनाथ शिंदेंनी दिला मदतीचा हात; उपचारांचा खर्च आणि मुलांच्या शिक्षणाची...

UP IPS Transfer : २०२७ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी योगी सरकारचा मोठा निर्णय; उत्तर प्रदेशात सात एडीजींसह ३० वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

Adani Airlines: एअर इंडिया-इंडिगोनंतर विमान क्षेत्रात नवा खेळाडू! अदाणी समूहाची लवकरच नव्या क्षेत्रात एन्ट्री?

SCROLL FOR NEXT