पुणे

शिक्षण समितीच्या निवडीची प्रतीक्षा

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - महापालिका शिक्षण समितीसाठी अद्याप सदस्यनिवडीची प्रतीक्षा कायम आहे. समितीचे अधिकार काय असतील, समितीत किती सदस्य असतील, याबाबतचा निर्णय प्रशासकीय स्तरावर घेतला जाणार आहे. त्यानंतर हा प्रस्ताव आयुक्तांकडून विधी समिती किंवा थेट सर्वसाधारण सभेत ठेवला जाऊ शकतो. 

महापालिका शिक्षण मंडळाची मुदत एक जूनला संपुष्टात आली. त्यानंतर महापालिका स्तरावर नगरसेवकांची शिक्षण समिती गठित होणे आवश्‍यक होते. जून आणि जुलै असे दोन महिने उलटल्यानंतरही अद्याप याबाबतचा निर्णय प्रलंबित आहे. 

सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, ‘‘शिक्षण समितीचे लवकरच गठन केले जाणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव विधी समितीकडे किंवा थेट सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवला जाईल.’’ सहायक आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे म्हणाले, ‘‘शिक्षण समितीचे अधिकार व कार्यकक्षा याबाबत विचारविनिमय करून निर्णय घेतल्यानंतर तसा प्रस्ताव आयुक्तांकडे सादर केला जाईल.’’ नगरसचिव उल्हास जगताप म्हणाले, ‘‘शिक्षण समितीत नऊ नगरसेवकांना पक्षीय बलाबलानुसार संधी मिळणार आहे. विषय समितीप्रमाणेच ही समिती असेल. मात्र, त्याबाबतचा प्रस्ताव अद्याप प्रशासनाकडून आलेला नाही.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold price prediction : सोने पु्न्हा दोन लाखांवर जाणार? तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज, चांदी दर नवा उच्चांक गाठणार

OUCH..! फलंदाजाचा सरळ फटका अन् चेंडूने अम्पायरचा गाल केला 'लाल'; ICU मध्ये करावे लागले दाखल, धडकी भरवणारा Viral Video

Pune : खड्ड्यामुळे ११ वर्षीय मुलाचा बळी! दुचाकी घसरली, मागून येणाऱ्या ट्रकने चिरडलं; वडिलांच्या डोळ्यादेखत मृत्यू, VIDEO VIRAL

Marathi News Updates : चाकण एमआयडीसीनंतर आज आदित्य ठाकरे करणार हिंजवडी आयटी पार्क दौरा

Nitin Gadkari: पुण्यात पुढील दोन वर्षांत ६० हजार कोटींचे प्रकल्प; नितीन गडकरींची मोठी घोषणा, वाहतूक कोंडी सुटणार!

SCROLL FOR NEXT