पुणे

राष्ट्रवादीचा आज ‘एल्गार’

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार, तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजप सत्तेच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने एल्गार पुकारला आहे. याअंतर्गत शनिवारी (ता. ७) पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार स्वत: रस्त्यावर उतरणार असून, त्यासाठी पक्षाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे.

मोर्चासाठी भव्य रथ तयार करण्यात आला आहे. या रथात गाढ झोपी गेलेल्या कुंभकर्णाचा प्रतीकात्मक पुतळा असणार आहे. शिवाय भाजीपाला घेऊन काही बैलगाड्याही सवाद्य सहभागी होणार आहेत. वाढती महागाई, नोटाबंदी, जीएसटी यासारख्या निर्णयांमुळे सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. गॅस सिलिंडर, पेट्रोल, डिझेलच्या किमतींचा भडका उडाला आहे. या केंद्र सरकारच्या अखत्यारीतील प्रश्‍नांबरोबर राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या, मुंबई ते नागपूर समृद्धी मार्ग, सणासुदीच्या तोंडावर जीवनावश्‍यक वस्तूंची टंचाई व भाववाढ इत्यादी राज्य सरकारशी संबंधित प्रश्‍न आणि स्थानिक पातळीवरील निगडी-कात्रज मेट्रो सुरू करणे, अनधिकृत बांधकामांचा प्रश्‍न, आंद्रा तसेच भामा आसखेड धरणातून पाणी मिळविणे, बंदिस्त जलवाहिनी योजना, राष्ट्रवादीच्या काळात भूमिपूजन झालेल्या व मंजूर झालेल्या पण रखडलेल्या योजना इत्यादी महत्त्वाच्या प्रश्‍नांवर आंदोलन होणार आहे. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, माजी आमदार विलास लांडे, अण्णा बनसोडे, विरोधी पक्षनेते योगेश बहल, मंगला कदम, भाऊसाहेब भोईर, दत्ता साने, नीलेश डोके, आजी-माजी नगरसेवक, विशाल वाकडकर, वैशाली काळभोर, सुनील गव्हाणे सहभागी होणार आहेत.

असा असेल मोर्चाचा मार्ग
मोर्चा दुपारी ३ वाजता पंचपीर चौक-काळेवाडी येथून सुरू होईल. तेथून पिंपरी पूल, सेवा विकास बॅंक, जमतानी चौक, जायका चौक, साई चौक, शगून चौक, मुख्य बाजारपेठ, भाटनगर, इंदिरा गांधी रेल्वे उड्डाण पूल, गोकूळ हॉटेलमार्गे पिंपरीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आल्यावर मोर्चाचा समारोप होईल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Crash: ट्रम्पच्या एका निर्णयाने भारतीय शेअर बाजार हाहाकार! सेन्सेक्स 1700 अंकांनी कोसळला; नेमकं काय घडलं?

Pimpri Building Collapse: पुण्यात मोठी दुर्घटना! पिंपरी-चिंचवडमध्ये इमारत कोसळली; १४ पेक्षा जास्त लोक ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू

Latest Marathi News Live Update : इमारतीचा भाग कोसळल्याने 15 ते 20 कामगार ढिगाऱ्याखाली अडकले

Pune: शेतकऱ्यांच्या आसवांचा बांध फुटला; कालपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान

Pandharpur Wari 2026: लाखो लोक पायी पंढरपूरला का जातात? वारी म्हणजे काय अन् वारकरी नेमकं कोणाला म्हणतात? इथे वाचा

SCROLL FOR NEXT