पुणे

‘एचए’च्या जमिनीसाठी प्राप्तिकर खात्याच्या हालचाली

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - हिंदुस्तान ॲन्टिबायोटिक्‍स (एचए) कंपनीने विक्रीसाठी काढलेल्या ८७ एकर जमिनीपैकी सुमारे २५ एकर जमीन खरेदी करण्याच्या हालचाली प्राप्तिकर खात्याने सुरू केल्या आहेत. या संदर्भात प्राप्तिकर खात्याने केंद्रीय रसायन मंत्रालयाकडे पत्रव्यवहार केला असल्याची माहिती सूत्रांनी ‘सकाळ’ला दिली. 

एचए कंपनीची २५ एकर जमीन खरेदी केल्यानंतर त्या ठिकाणी प्राप्तिकर खात्याचे कार्यालय आणि अधिकाऱ्यांसाठी निवासी संकुल उभारण्याची या खात्याची योजना आहे. सध्या प्राप्तिकर खात्याची कार्यालये शहराच्या विविध भागांमध्ये आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात आकुर्डीमध्ये तर पुण्यात साधू वासवानी रोड, सॅलिसबरी पार्क, स्वारगेट आणि प्रभात रोड या ठिकाणी प्राप्तिकराची कार्यालये आहेत. एचए कंपनीची जागा मिळाल्यास सर्व कार्यालये एकाच ठिकाणी कार्यरत राहतील. याखेरीज नागरिकांसाठी आवश्‍यक असणारे सुविधा केंद्र त्या ठिकाणी उभी करणे शक्‍य होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. जागा उपलब्ध करून देण्याबाबत काही दिवसांपूर्वी विभागीय आयुक्‍तांशीदेखील पत्रव्यवहार करून त्याबाबत सविस्तर चर्चाही झालेली आहे. एचए कंपनीने लिलावात काढलेल्या ८७ एकर जमिनीची खरेदी फक्‍त सरकारी उपक्रम आणि सरकारी कंपन्यांनाच करता येणार असल्याची अट आहे. त्यामुळे प्राप्तिकर खात्याला त्याचा फायदा मिळू शकतो. 

महापालिकेचीही तयारी
पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही ‘एचए’ची ५९ एकर जागा घेण्याची तयारी सुरू केली आहे. त्यावर आरक्षण टाकण्यासाठी २० जून रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत प्रस्ताव मांडला आहे. जागेच्या बदल्यात कंपनीला विकास हस्तांतरण हक्क (टीडीआर) देण्याचे महापालिकेचे प्रयोजन आहे. प्राप्तिकर खाते आणि महापालिकेशिवाय राज्य आणि केंद्र सरकारच्या अन्य काही विभागांनीही एचए कंपनीच्या जागेत स्वारस्य दाखविले आहे. कंपनीच्या जमिनीची लिलाव प्रक्रिया साधारणतः सहा महिने चालणार आहे. त्यानंतर यामध्ये कोणत्या सरकारी यंत्रणांनी अर्ज भरला आहे, याची माहिती मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: प्रीतिसंगमावर सुनेत्रा-सुप्रिया एकत्र! टप्प्याटप्प्याने समाधीस्थळी आगमन; काही काळ एकत्रित उपस्थितीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Nvidia CEO Jensen Huang : एनव्हिडियाचे सीईओ जेनसन हुआंग डिप्रेशनमध्ये? पत्नीची जाहीरपणे माफी; रोज घेतात दीड तास समुपदेशन

Marathi Short Film: व्याधीपलीकडील भावविश्वाचा शोध; सावंतवाडीतील कलाकारांच्या ‘दर्या’ लघुपटाला प्रतिसाद

एका पक्षाकडून निवडणूक जिंकली नंतर पक्षांतर... आता निवडणुकीचा खर्चही वसूल होणार? सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्रासह निवडणूक आयोगाला नोटीस

Koyna Dam Project: कोयनासाठी पाच जीवांचे बलिदान; पेठवडगावातील कोरवी कुटुंबाच्या पदरी उपेक्षाच

SCROLL FOR NEXT