पुणे

नॉलेज सेंटरचेही आम्हीच ‘सारथी’

मिलिंद वैद्य

पिंपरी - स्मार्ट सिटी असेल, की अमृत योजना सरकारने विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी माहिती तंत्रज्ञानाचा योग्य पद्धतीने वापर करण्याचे ठरविले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने २०१३ मध्ये ‘सारथी हेल्पलाइन’ सुरू केली. आज ही योजना सरकारी स्तरावर यशस्वी होत आहे. देशातील २१९ शहरांत ‘सारथी’ सुरू करण्यासंबंधी केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने नुकतेच सूचित केले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने ‘सारथी नॉलेज सेंटर’ (एसकेसी) सुरू करण्याचे ठरविले असून, मुंबई महापालिकेच्या धर्तीवर कायमस्वरूपी उत्पन्नाचा स्रोत निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

‘सारथी’चा ‘पायलट’ प्रकल्प पिंपरी-चिंचवडचा असल्याने साहजिकच तो कसा राबवायचा याविषयी महापालिकेकडे विचारणा होऊ शकते, त्यामुळे या संकल्पनेचे स्वामित्व (रॉयल्टी) आपल्याकडे ठेवून सारथी नॉलेज सेंटर विकसित केले जाईल, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. ते म्हणाले, ‘‘गेल्या चार-साडेचार वर्षांत ‘सारथी’च्या आवृत्तीमध्ये दोन वेळा सुधारणा करण्यात आली; पण त्या इंग्रजी व हिंदी भाषांच्या समावेशासाठी होत्या. आता राष्ट्रीय स्तरावर सरकारने ‘सारथी’चा वापर सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी काही महिन्यांपूर्वी पिंपरीत एक कार्यशाळा घेण्यात आली. आतापर्यंत विविध राज्यांतील सरकारी शिष्टमंडळांनी सारथीचे प्रशिक्षण घेतले आहे. राज्य सरकारने एका खास आदेशाद्वारे राज्यातील महापालिका, नगरपालिका, परिवहन विभाग अशा विविध विभागांसाठीही सारथी सेवा सुरू करण्याची सूचना केली आहे.

त्यामुळे सारथी देशपातळीवर यशस्वी होत असून, आपल्याकडे पायलटप्रमुख (नोडल एजन्सी) म्हणून पाहिले जात आहे. त्यासाठीच आपण सारथी नॉलेज सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच त्यासाठी गतीने कामाला सुरवात केली जाईल.’’

तत्कालीन महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी २०१३ मध्ये ‘सारथी हेल्पलाइन’ची संकल्पना उचलून धरली. शहरातील तरुण माहिती तंत्रज्ञ अमोल देशपांडे यांची ही संकल्पना होती. चालना मिळाल्यावर देशपांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तसे सॉफ्टवेअर तयार केले. ज्याला आज देशभरात मान्यता मिळत आहे.

मुंबई महापालिकेने अनुभव व निष्णात तंत्रज्ञानाच्या बळावर राज्यातील इतर महापालिकांचा सशुल्क विकास आराखडा (डीपी) बनवून देण्यासाठी स्वतंत्र विभाग सुरू केला आहे. त्याच धर्तीवर आपण सारथी नॉलेज सेंटर उभारून कायमस्वरूपी उत्पन्नाचा स्रोत निर्माण करू शकतो.
- श्रावण हर्डीकर, आयुक्त, महापालिका

सारथीचा देशपातळीवर दिवसेंदिवस वापर वाढत आहे. डॉ. परदेशी यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे ही संकल्पना प्रत्यक्षात आणू शकलो. तयारी असेल तर आपल्या शहरासाठी, राज्यासाठी आणि पर्यायाने देशासाठी यापुढेही महापालिकेबरोबर काम करायला आवडेल.
- अमोल देशपांडे, माहिती तंत्रज्ञान अभ्यासक

सारथी हेल्पलाइनमुळे काय साधले?
नागरिकांना माहिती तसेच तक्रारनिवारण, सेवा आणि प्रतिसाद मिळू लागला
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ३३ सेवा सध्या ऑनलाइन सुरू
पेपरलेस कामकाजाला मिळाली चालना
नागरिकांना सोशल मीडियाचे महत्त्व समजले

सारथी नॉलेज सेंटरचे फायदे
देशात सारथीची नोडल एजन्सी म्हणून महापालिकेला मान्यता
स्वामित्वामुळे मूळ सॉफ्टवेअरमध्ये बदलाचे अधिकार अबाधित राहणार
महापालिकेला कायमस्वरूपी उत्पन्नाचा स्रोत मिळणार
देशाच्या नकाशावर पिंपरी-चिंचवडचे नाव झळकणार
सरकारच्या पेपरलेस कामकाजाला गती मिळणार
स्मार्ट सिटी, अमृत, स्वच्छ भारत आदी राष्ट्रीय उपक्रम राबविणे सोपे

कशाची आवश्‍यकता
प्रबळ राजकीय इच्छाशक्ती आणि सरकारची संमती
पेपरलेस कारभाराला आणखी गती 
सारथी नॉलेज सेंटरसाठी डेटा एक्‍स्पर्ट व स्वतंत्र स्टाफ 
स्वतंत्र व्यावसायिक आयटी संस्थेची मदत  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

H-1B Visa Fee Hike : अमेरिकेने एच-१ बी व्हिसा केला महाग, भारतीयांवर होणार थेट परिणाम, नेमंक काय घडलं?

SSC Paper Leak News: खळबळ! दहावी पूर्व परीक्षेचा पेपर फुटल्याची चर्चा?, समाज विज्ञानचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल

भारतीय क्रीडा विश्वावर शोककळा! ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या खेळाडूचे निधन

Latest Marathi News Live Update : जालन्यात ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या काळात आधार, पॅन आणि मतदान कार्ड कचऱ्यात

Nitin Gadkari: गरिबांचे जीवन सुसह्य करण्याचा संकल्प: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी; पश्चिम, उत्तर नागपूरमधील मतदारांशी साधला संवाद!

SCROLL FOR NEXT