खराळवाडी, पिंपरी - पिंपरी ते रेंजहिल्स दरम्यान सेगमेंटचे सुरू असलेले काम. 
पुणे

मेट्रोच्या कामाला पिंपरीत गती

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - पिंपरी ते रेंजहिल्सदरम्यान सुरू असणाऱ्या मेट्रोच्या कामाची गती वाढली आहे. खराळवाडीजवळ खांबावरील पुलाच्या बांधकामाला सुरवात झाली असून, त्याच्या पहिल्या सेगमेंटची उभारणी पूर्ण केली आहे. 

येत्या काही दिवसांमध्ये या कामाचा वेग आणखी वाढणार आहे. बॉक्‍स गर्डर तंत्रज्ञानाचा वापर करून या सेगमेंटची निर्मिती करण्यात आली असून, त्याचे वजन सुमारे ५० टनांच्या आसपास आहे. सेगमेंट बसविण्यासाठी मोठ्या क्रेनचा वापर करण्यात आला आहे. नाशिक फाट्याजवळील कास्टिंग यार्डमध्ये हे सेगमेंट तयार करण्याचे काम सुरू आहे. सध्या त्या ठिकाणी ४० सेगमेंट तयार करण्यात आले आहेत. 

दरम्यान, खराळवाडी ते कासारवाडीदरम्यानच्या रस्त्यावर मेट्रोचे पिलर उभारण्याचे काम वेगात सुरू आहे. त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर सेगमेंट बसवण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. कासारवाडीच्या पुढील टप्प्यातील काम मेट्रोने सुरू केले असून, त्या ठिकाणी पिलरची उभारणी करण्यासाठी खोदाईचे काम हाती घेण्यात आले आहे. 

फुगेवाडी भागातील रस्त्यावर पिलर उभारण्याचे काम येत्या दीड महिन्यामध्ये पूर्ण करण्यात येणार आहे. हॅरिस पुलावरील कामाला पुढील महिन्यात सुरवात होणार असून, त्या ठिकाणी दहा पिलर उभारण्याचे नियोजन आहे. हे पिलर नदीमध्ये उभे करण्यात येणार असून, पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे मेट्रोच्या सूत्रांनी सांगितले.

खडकीतील कामाला उशीर होण्याची शक्‍यता
मेट्रोचे खडकी परिसरातील काम उशिराने सुरू होण्याची शक्‍यता आहे. या भागात पुणे महापालिकेकडून रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले असले, तरी या कामाला अद्याप गती मिळालेली नाही. रस्ता रुंदीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतरच या भागात मेट्रोला काम करता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Live News : सरकारने लोकांची गैरसोय करुन आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न केला- आशुतोष रांका

RBI Special Window: रिझर्व्ह बँकेची ‘स्पेशल विंडो;तेल कंपन्यांना होणार डॉलरचा अखंडित पुरवठा

Amravati Crime: अमरावतीत आयटी इंजिनिअरने आईला संपवलं, स्वत:च पोलिसांना जाऊन सांगितलं

IND A vs AUS A: सूर्यांश शेडगेची झुंज! भारत अ संघाने ऑस्ट्रेलियासमोर ठेवलं २७६ धावांचं लक्ष्य

Jharkhand Tribal Woman : आदिवासी महिलेला पोलिस ठाण्यात उलटे टांगले अन्... पोलिसांच्या धक्कादायक कृत्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल

SCROLL FOR NEXT