पुणे

शहरात धावणार मिडी गाड्या

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - शहरातील अंतर्गत मार्गांवर लवकरच पीएमपीच्या नवीन मिडी गाड्या धावणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना चांगली सुविधा मिळणार आहे. या गाड्या आकाराने लहान असल्याने त्या मोठ्या गाड्यांच्या तुलनेत जास्त लवकर प्रवाशांची वाहतूक करू शकतील. डिसेंबरच्या अखेरीला किंवा नववर्षाच्या प्रारंभी या गाड्यांची सेवा शहरास उपलब्ध होईल.

पिंपरी-चिंचवडमधील दोन बसमार्गांवर बीआरटी बससेवा असून, जानेवारीत निगडी-दापोडी मार्गावर; तर जूनमध्ये काळेवाडी ते देहू आळंदी रस्ता या मार्गावर बीआरटी सुरू होईल. बीआरटी बससेवेला जाण्यासाठी शहराच्या विविध भागांतून मिडी गाड्यांतून प्रवाशांना जलद जाता येईल.

पीएमपीतर्फे दोनशे मिडी गाड्या खरेदी करण्यात येणार आहेत. त्यापैकी साठ गाड्या पहिल्या टप्प्यात मिळणार आहेत. त्यापैकी चाळीस गाड्या पुणे शहराला आणि वीस गाड्या पिंपरी-चिंचवड महापालिकेला मिळतील. शहरांतर्गत ज्या रस्त्यांवर वाहतुकीची जास्त गर्दी आहे; तसेच रस्ते अरुंद आहेत. अशा ठिकाणी मिडी गाड्या उपयुक्त ठरतील.

पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे या संदर्भात "सकाळ'ला माहिती देताना म्हणाले, 'काही मिडी गाड्या आल्या होत्या. त्यामध्ये बसविलेली आयटीएमएसची सुविधा अपेक्षेप्रमाणे नव्हती. त्यात काही त्रुटी होत्या. त्या दुरुस्त करून देण्यास संबंधित कंपनीला सांगितले आहे. त्या गाड्या मिळाल्यानंतर त्या मार्गांवर पाठविण्यात येतील. डिसेंबरमध्ये त्या गाड्या मिळतील, अशी अपेक्षा आहे.''

पिंपरी-चिंचवड शहरात अंतर्गत मार्गांवर पुरेशी बससेवा उपलब्ध नसल्याची तक्रार आहे. त्यापैकी तीन मार्गांवर बससेवा सुरू केली. नववर्षात शहरवासीयांची ती तक्रार दूर करण्यात येईल. त्यांच्यासाठी मिडी गाड्या उपलब्ध करून दिल्या जातील. अरुंद रस्ते आणि गर्दीच्या मार्गांवर त्या धावतील. काही नवीन मार्गही सुरू करण्यात येतील. त्यामुळे प्रवाशांच्या अडचणी दूर होतील.
- तुकाराम मुंढे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Pune News : विनापरवाना लावणीचा कार्यक्रम; मंडळाच्या अध्यक्षांसह नृत्यांगना राधा पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

Social Media: 'Likes' मुळे वाढतोय मानसिक ताण? Post's च्या मोहात अडकतात डिप्रेशनग्रस्त लोक; संशोधनातून धक्कादायक खुलासा!

Marathi News Live Updates: तळेगाव ढमढेरे परिसरात विजेमुळे ग्रामस्थ त्रस्त

आई म्हणाली ‘चॉकलेट बंद कर’; स्क्वॉशपटू अनाहतने थेट न्यूट्रिशनिस्टलाच फोन केला! नेमकं काय घडलं? Viral Video

SCROLL FOR NEXT