पुणे

महाकाली, काळभोर टोळीला मोका लावणार - गणेश शिंदे

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - रावण टोळीचा म्होरक्‍या अनिकेत जाधव याच्या खून प्रकरणात महाकाली आणि सोन्या काळभोर टोळीचा हात असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील आरोपींना मोका लावण्यात येणार असल्याची माहिती परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्‍त गणेश शिंदे यांनी सांगवी येथील पत्रकार परिषदेत दिली.

रावण टोळीचा प्रमुख अनिकेत जाधव याचा 20 नोव्हेंबर रोजी डोक्‍यात दगड घालून खून झाला होता. या प्रकरणात कुख्यात महाकाली टोळीचा हणम्या शिंदे आणि सोन्या काळभोर टोळीचा म्होरक्‍या सोन्या काळभोर याला अटक झाली आहे. आकुर्डी, रावेत परिसरात या दोन्ही टोळ्यांची दहशत आहे. यापूर्वी सोन्या काळभोर टोळीने भोसरीतील संतनगर भागात अनेक वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण केली होती. त्या वेळी भोसरी पोलिसांनी सोन्या काळभोरसह 22 जणांना मोका लावला होता. मात्र, तांत्रिक कारण देत तो नंतर रद्द केला होता. त्यानंतर काळभोर टोळीचे गुन्हे अधिकच वाढले. वर्चस्वासाठी आता या टोळ्यांकडून खूनही केले जात आहेत.

अनिकेत जाधव खुनाच्या गुन्ह्यात मोका लावण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे. यामुळे गुन्हेगारी टोळ्यांच्या गुन्ह्यांना आळा बसेल. मात्र, यापूर्वीचा मोका नेमक्‍या कोणत्या कारणामुळे रद्द झाला, याबाबत माहिती घेण्याचे काम सुरू आहे.
- गणेश शिंदे, पोलिस उपायुक्‍त, परिमंडळ तीन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: डिफेंडर कारवरून टीका; मनोज जरांगे पाटलांनी कराडच्या सभेत दिलं थेट उत्तर, म्हणाले...

Shirur Accident : पुणे-नगर रस्त्यावर अपघात; एन्डेवर चालक व दूचाकीस्वाराचा जागीच मृत्यु

समृद्धीवर १२०च्या स्पीडने गाड्या धावतात, नो पार्किंगमध्ये कंटेनर लावला, गंभीर अपघाताची शक्यता; त्या चालकावर गुन्हा दाखल, आरटीओकडून कारवाई

Viral Video : 'या' शहराच्या मातीत विखुरलय सोनं, लोक वेचून कमवाताहेत लाखो रुपये; पाहा व्हिडिओ

Eleventh Admission : अकरावी प्रवेशासाठी अंतिम संधी

SCROLL FOR NEXT