पिंपरी - ‘सकाळ’च्या विभागीय कार्यालयास ‘वेलकम जिंदगी’ नाटकाच्या टीमने भेट दिली. (डावीकडून) अभिनेता भरत जाधव, डॉ. गिरीश ओक, शिवानी रांगोळे, दिग्दर्शक राजन ताम्हाणे आणि लेखक-निर्माता शेखर ताम्हाणे.
पिंपरी - ‘सकाळ’च्या विभागीय कार्यालयास ‘वेलकम जिंदगी’ नाटकाच्या टीमने भेट दिली. (डावीकडून) अभिनेता भरत जाधव, डॉ. गिरीश ओक, शिवानी रांगोळे, दिग्दर्शक राजन ताम्हाणे आणि लेखक-निर्माता शेखर ताम्हाणे. 
पुणे

‘वेलकम जिंदगी’तून भावनांची गंमत

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - वय कितीही झालं तरी बाप मुलांना आयुष्य म्हणजे काय, हे शिकवायचं थांबवत नाही आणि मुलं कितीही चुकली तरी बाप मनाला लावून घेत नाही. या दोन टोकांच्या भावभावनांमध्ये अनेक नाट्यमय प्रसंगांतून जीवनाची गंमत सांगणारं नाटक म्हणजे ‘वेलकम जिंदगी’. मराठी प्रेक्षकांना भावणाऱ्या सगळ्या मुद्यांचं व्यवस्थित भान ठेवून रचलेलं हे नाटक. नेहमीप्रमाणे हिरो हिरोइन नाही, प्रेमकथा नाही किंवा बाप-मुलांमधला किंवा अन्य कौटुंबिक कलह नाही.

राजकारण, समाजकारण आणि त्यावरचं कोणतंही भाष्य नाही आणि तरीही अत्यंत ‘इंटरेस्टिंग’ असलेलं हे नाटक पिंपरी-चिंचवडकरांनी आवश्‍य पाहावं, असं आवाहन दिग्दर्शक राजन ताम्हाणे आणि निर्माता, लेखक शेखर ताम्हाणे यांनी ‘सकाळ’च्या व्यासपीठावरून केलं. 

‘सकाळ’च्या पिंपरी विभागीय कार्यालयाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त गुरुवार (ता. २३) ते रविवार (ता. २६) दरम्यान ‘नाट्य महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर नाटकातील प्रमुख कलाकार अभिनेते डॉ. गिरीश ओक, भरत जाधव आणि शिवानी रांगोळे यांच्यासह ताम्हाणे यांनी ‘सकाळ’च्या पिंपरी कार्यालयाला भेट दिली. या वेळी त्यांनी नाटकाची कथा, पटकथा, त्याची मांडणी आणि कलाकारांच्या अभिनयाविषयी दिलखुलास गप्पा मारल्या. 

‘‘सौम्य जोशी हा गुजराती रंगभूमीवरचा तरुण पिढीतला नाटककार आहे. त्याने यापूर्वीदेखील वेगळ्या प्रकृतीची नाटकं लिहिली आहेत. ‘वेलकम जिंदगी’तूनही त्याने ‘डिलाइट फूल’ कॉमेडी बांधताना कथेतल्या गंमती उत्तमप्रकारे हेरल्या आहेत. 

गुतरातीमधून लिहिलेल्या या नाटकाचे अत्यंत चपखल मराठीकरण केले आहे. इतकंच काय; पण नाटकातील प्रसंग मराठीतच घडताहेत की काय, असा भास व्हावा, अशाप्रकारे त्यांची मांडणी केली गेली,’’ असे राजन ताम्हाणे यांनी सांगितले. 

तर ‘‘राजन ताम्हाणे हे नेपथ्य, प्रकाश, संगीत या तांत्रिक बाजूंची ‘केमिस्ट्री’ काटेकोरपणे सांभाळणारे दिग्दर्शक आहेत. त्यामुळे त्यांच्या दिग्दर्शनात ही गोष्ट रंगतदार, रेखीव नाट्यप्रयोगाचा आकार घेऊन अवतरली आहे,’’ असे भरत जाधव म्हणाला. 

मी आतापर्यंत अनेक विविधांगी भूमिका केल्या; परंतु माझी विनोदी अभिनेत्याची बाजू प्रेक्षकांना विशेष भावली. तरीदेखील माझ्या आतापर्यंतच्या विनोदी भूमिकांनी नादावलेल्या प्रेक्षकांना (वय वर्षे ७५ असलेल्या वयोवृद्धाची भूमिका असलेले) हे नाटक एक ‘सरप्राइझ’ आहे, असेही तो म्हणाला. 

नाटकात मुख्य भूमिकेत असलेल्या डॉ. गिरीश ओक यांनी १०२ वर्षांच्या वृद्धाची भूमिका साकारली आहे. त्याबाबत ते म्हणाले, ‘‘१०२ वर्षांच्या मनाने तरुण असलेला म्हातारा उभा करताना मी पांढऱ्या दाढीमिशा लावण्यात आल्या असल्या, तरी पेहराव आणि शरीर हालचाली एखाद्या तरुणासारख्या आहेत. शरीराच्या मर्यादा सांभाळतच अवखळपणा दाखविणारी ही भूमिका असल्याने ती प्रेक्षकांसाठी ‘एन्जॉएबल’ आहे.’’ 

तर पहिल्यांदाच व्यावसायिक नाटक करणारी शिवानी रांगोळे म्हणाली, ‘‘मुळात या नाटकांची केमेस्ट्री वेगळी असल्याने त्यांच्याबरोबर प्रत्यक्ष काम करताना सुरवातीलाच हे दडपण गळून पडलं. पात्रांची परस्परांशी असलेल्या ‘फ्रेंडशिप’मुळेही अभिनयात मोकळेपणा आला. त्यामुळेच भरत व डॉ. ओक यांच्याबरोबर काम करताना टेंशन आलंच नाही.’’ 

चिंचवडमधील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात होणाऱ्या या कार्यक्रमाचे मुख्य सहयोगी प्रायोजक कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स, तर सहप्रायोजक भाऊसाहेब भोईर आहेत.

‘सकाळ’ नाट्यमहोत्सव
कोठे : रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड
केव्हा : २३ ते २६ नोव्हेंबर, रोज रात्री ९.३० वा.
प्रवेशिका मिळण्याचे ठिकाण : रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड 
वेळ : स. १० ते ८
सकाळ, पिंपरी- चिंचवड विभागीय कार्यालय 
फोन बुकिंगसाठी संपर्क : ८९७५२३७०४१ प्रवेशिका http://Ticketees.com o book my show यावरही उपलब्ध आहेत. 
अधिक माहितीसाठी संपर्क : ९५४५९५४७३३

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT