देहूरोड - रस्ते विकास महामंडळातर्फे उभारण्यात येणारा उड्डाणपूल. 
पुणे

निगडी- देहूरोड चौपदरीकरणाचे 'तीनतेरा'

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - जुन्या पुणे- मुंबई महामार्गावरील निगडी ते देहूरोड या मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रस्ते विकास महामंडळाकडून सुरू आहे. मात्र, वाहनांच्या सुरक्षेसाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याचे ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीत निदर्शनास आले आहे. 

निगडी- देहूरोड रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम अनेक ठिकाणी अर्धवट आहे, त्यामुळे वाहनचालकांची तारांबळ उडते. वाहतूक पोलिसांनी या मार्गावरून अवजड वाहनांना बंदी केलेली आहे, तरीही अनेक अवजड वाहनचालक रात्री या मार्गाचा वापर करतात. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे काम सुरू असलेल्या ठिकाणी रस्त्याची पूर्णतः वाताहत झालेली आहे. रस्ता उखडला असून, खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे. काम सुरू असलेल्या ठिकाणी मोठमोठे ट्रक, ट्रेलर उभे केलेले असल्याचे आढळले. वाहनांच्या सुरक्षेसाठी कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत. काम सुरू असलेल्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्याची आवश्‍यकता आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केलेले दिसते. अनेक ठिकाणी पाणी साठल्यामुळे वाहनचालकांना त्रासदायक ठरत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून संथगतीने काम सुरू आहे, त्यामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे.

देहूरोड चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. सुमारे पावणेदोन किलोमीटरचा उड्डाण पूल अठरा महिन्यांत पूर्ण करण्याची मुदत आहे. आतापर्यंत केवळ ४० टक्‍केच काम झालेले आहे. पुलाचे काम ३१ डिसेंबर २०१७ रोजी सुरू झाले. ३० जून २०१८ पर्यंत कंत्राटदाराला हे काम पूर्ण करायचे आहे. या पुलासाठी ४३ कोटी ५० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. देहूरोड येथील गुरुद्वारा ते रेल्वे उड्डाण पूल या दरम्यान रस्त्यावरील उड्डाण पूल असेल. 

निगडी ते देहूरोड मार्गाचे काम करताना रस्ते विकास महामंडळाने सुरक्षा उपाययोजनांचे पालन केलेले नाही. त्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे.
- मिलिंद गायकवाड, व्यावसायिक 

निगडी- देहूरोड मार्गाचे काम टप्प्याटप्प्यांऐवजी एकाच वेळेस सुरू केल्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती करणे, दिशादर्शक फलक लावणे आवश्‍यक आहे.
- अरुण वैद्य, संगणकतज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elon Musk Target Mukesh Ambani: ‘प्रिय पंतप्रधान अंबानी...’ एलॉन मस्क यांची मुकेश अंबानींवर उपरोधिक टीका; नेमका वाद काय?

Accident News :मोर्शी-मायवाडी फाट्यानजीक भीषण अपघात; महिला आणि पुरुषाचा जागीच मृत्यू

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १० ऑक्टोबर २०२६ ते १६ ऑक्टोबर २०२६ - मराठी राशी भविष्य

Navratrotsav : नवरात्रोत्सवानिमित्त पोलिसांनी वाहतुकीत केले बदल

IND vs WI 2nd T20I: ४१ चेंडूंत २०४ धावा! वेस्ट इंडिजने कहर केला ना भावा; एक, दोन, तीन नव्हे मोडले अनेक विक्रम, Shai Hopeचे पराक्रम...

SCROLL FOR NEXT