पुणे

अजगर, मगरीची चोरी, सापांच्या मृत्यूवरून वादंग

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - महापालिकेच्या संभाजीनगर येथील बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयातील अजगर, मगरीची चोरी आणि सापांचा मृत्यू आदी मुद्‌द्‌यांवरून मंगळवारी (ता.28) सर्वसाधारण सभेत जोरदार वादंग झाले. सभेमध्ये उपसूचना न वाचता मंजूर केल्या जात असल्याबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्यांनी आक्षेप घेतला; तर राष्ट्रवादी कॉंग्रेस महापालिकेत सत्तेत असताना ढिगाने उपसूचना मंजूर केल्या जात होत्या, असा प्रतिटोला भाजपच्या सदस्यांनी लगावला.

महापालिका भवनात झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते. महापालिकेच्या 2017-18 या आर्थिक वर्षाच्या मूळ अर्थसंकल्पात जमा बाजूस 35 लाख व उद्यान विभागाकडील गुलाबपुष्प उद्यानाजवळ मोकळ्या जागेवर प्राणी संगोपन केंद्राच्या कामासाठी असलेल्या तरतुदीत वाढ करण्याचा प्रस्ताव सभेत मंजुरीसाठी ठेवला होता. या प्रस्तावाला नामदेव ढाके यांनी प्रभागांतील कामांसाठी प्रशासकीय मंजुरी देण्याची उपसूचना मांडली. दरम्यान, ही उपसूचना पूर्ण वाचली न गेल्याने विरोधकांनी त्याला आक्षेप घेतला. सभेत उपसूचना पूर्णपणे न वाचता विषय मंजूर केला जात असल्याबद्दल विरोधी पक्षनेते योगेश बहल, माजी महापौर मंगला कदम, वैशाली घोडेकर तसेच दत्ता साने यांनी आक्षेप घेतला; तर सत्ताधाऱ्यांकडून सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे, आशा शेंडगे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयातील अजगर, मगर चोरी संदर्भात नेमके काय झाले? चौकशी अहवालावर काय कार्यवाही झाली, असा प्रश्‍न मनसेचे गटनेते सचिन चिखले यांनी उपस्थित केला; तर स्वीडन दौऱ्यात आयुक्तांनी काय केले, असा प्रश्‍न साने यांनी विचारला.

कोण काय म्हणाले?
* एकनाथ पवार (सत्तारूढ पक्षनेते) : महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेस सत्तेत असताना लोकशाहीचा गळा घोटला गेला. सध्या सत्ताधारी भाजपचा पारदर्शक कारभारावर भर आहे.
* योगेश बहल (विरोधी पक्षनेते) : उपसूचनांच्या माध्यमातून भाजप अनागोंदी कारभार करीत आहे. संख्याबळाच्या जोरावर चुकीच्या कारभाराविरोधात न्यायालयात धाव घेतली जाईल.
* सीमा सावळे (अध्यक्षा, स्थायी समिती) : आयुक्तांना काळे फासायचे होते का, असे म्हणून काय आयुक्तांना दमबाजी करता? प्राणिसंग्रहालयातील अजगर चोरी, सापांचा मृत्यू या घटनांच्या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस सत्तेत होते.
* मंगला कदम (माजी महापौर) : महापालिकेत भाजप सत्तेत असताना बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयातील मगरींची चोरी झाली. सापांच्या मृत्यूबाबत चौकशीची मागणी केली होती. त्यासाठी आता काय आयुक्तांना काळे फासायचे होते का?
* आशा शेंडगे (सदस्या, स्थायी समिती) : राष्ट्रवादी कॉंग्रेस सत्तेत असताना ढिगाने उपसूचना मंजूर केल्या जात होत्या. सत्ताधारी भाजपने भ्रष्टाचार केला असेल तर विरोधकांनी तो पुराव्यासह सिद्ध करावा.

बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयातील मोरांचा आजारपणाने मृत्यू झाला. अजगर, मगर चोरीप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. भटक्‍या कुत्र्यांबाबत नियमानुसार कार्यवाही केली जाते.
- डॉ. सतीश गोरे, पशुवैद्यकीय अधिकारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT