पुणे

पाकीटमारांमुळे प्रवासी त्रस्त

दीपेश सुराणा

पिंपरी-चिंचवड शहरातील दापोडी, पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, कासारवाडी आदी रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना दररोज जाणवणाऱ्या समस्यांबाबत ‘सकाळ’च्या प्रतिनिधीने प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती जाणून घेतली. रेल्वे स्थानकांवर विविध मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच एक्‍स्प्रेस ट्रेनसाठी थांबे, लोकलच्या फेऱ्या वाढविणे गरजेचे आहे, अशी मागणी प्रवाशांनी केली. त्याबाबतची वृत्तमालिका आजपासून प्रसिद्ध करीत आहोत. 

पिंपरी - शहरातील मध्यवर्ती पिंपरी रेल्वे स्थानकावर काही प्रमुख एक्‍स्प्रेस ट्रेन थांबत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. पिंपरी बाजारपेठेजवळ शगुन चौकाच्या बाजूने रेल्वे स्थानकावर ये-जा करण्यासाठी प्रवेशद्वार होण्याची गरज आहे. त्याशिवाय पादचारी पुलाचा वापर न करता धोकादायक पद्धतीने लोहमार्ग ओलांडणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. फलाटावर रात्रीच्या वेळी पाकीटमार आणि भुरट्या चोरांकडून प्रवाशांना त्रास दिला जातो. त्यासाठी पोलिसांची गस्त ठेवायला हवी.

शहरातील विविध रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना काय सुविधा मिळायला हव्यात, याबाबत ‘सकाळ’तर्फे प्रत्यक्ष पाहणी करण्यात येत आहे. त्याअंतर्गत पिंपरी रेल्वे स्थानकावर फिरल्यानंतर विविध समस्या प्रकर्षाने जाणवल्या, तर काही चांगल्या सकारात्मक बाबीही पाहण्यास मिळाल्या. रेल्वे स्थानकावर स्वच्छता चांगली आहे. पूर्वी प्रवाशांना पिण्यासाठी पाण्याची पुरेशी सोय नव्हती. आता दोन्ही फलाटावर पाण्यासाठी विविध ठिकाणी नळ बसविले आहेत. दोन्ही फलाटावर स्वच्छतागृहाची सोय केलेली आहे.

स्थानकावर काय व्हायला हवे
डेक्कन क्वीन, इंद्रायणी सुपरफास्ट, कोयना आणि भुसावळ एक्‍स्प्रेसचा थांबा पिंपरी रेल्वे स्थानकावर असावा.
पिंपरी बाजारपेठेच्या बाजूकडील फलाटावर स्वच्छतागृहात नियमित स्वच्छता गरजेची 
तिकीट आरक्षणाची सुविधा गरजेची 
रात्रीच्या वेळी हवी पोलिसांची गस्त

दुपारी १२.३० ते ३ दरम्यान फेऱ्या वाढविणे गरजेचे आहे. प्रवाशांनी सोबत जड चीजवस्तू असल्यास सामान ठेवण्यासाठी स्वतंत्र डब्यात ते ठेवायला हवे. त्यामुळे नियमित प्रवास करणाऱ्यांची अडचण होणार नाही.
- विशाल किर्ते, तरुण

पिंपरी बाजारपेठेतून रेल्वे स्थानकाकडे येणाऱ्या लोकांसाठी शगुन चौकाजवळील बाजूला स्थानकाकडे जाण्यासाठी दुसरे प्रवेशद्वार असायला हवे. तसेच, तेथेच तिकीट घरदेखील हलवावे. सध्या भाजी मंडईजवळ हे प्रवेशद्वार आणि तिकीट घर आहे. 
- रेवाचंद वादिया, व्यापारी

दुपारी १२.३० ते ३ या वेळेत लोणावळा-पुणे, तर दुपारी १.३० ते ३.३० या वेळेत पुणे-लोणावळा अशी एक लोकलची फेरी वाढवायला हवी. संबंधित वेळेत लोकल नसल्याने प्रवाशांची गैरसोय होते.
- जगनदास दखनेचा, ज्येष्ठ नागरिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT