पुणे

मुलगी झाली, लक्ष्मी आली...

सकाळवृत्तसेवा

पिंपळे सौदागर येथील कोकणे मित्र मंडळाचा अभिनव उपक्रम

पिंपरी - अलीकडे ‘बेटी बचाओ’चा नारा प्रत्येक जण लगावतो..पण,
त्यातील किती जण त्याला कृतीची जोड देतात.. कसलेही शुल्क न आकारता मुलींच्या जन्माचे स्वागत करणारा डॉ. गणेश राख यांच्यासारखा एखादाच असतो. मात्र, ज्या घरी मुलगी जन्माला येईल, त्या कुटुंबाला पाच हजार रुपये देण्याचा उपक्रम पिंपळे सौदागर येथील कोकणे मित्र मंडळाने हाती घेऊन समाजासमोर नवा आदर्श ठेवला आहे. मंडळाचे अध्यक्ष उल्हास कोकणे यांनी तो मोठ्या नेटाने सुरू ठेवला असून, आतापर्यंत त्यांनी २० मुलींचे असे अनोख्या पद्धतीने स्वागत केले आहे. 

मंडळाचे यंदाचे हे पाचवे वर्ष आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांत कोकणे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी अनेक सामाजिक उपक्रमात पुढाकार घेतला आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी वाचनालय सुरू करण्यापासून रक्तदान शिबिर, मेळावे, व्याख्याने, वारकऱ्यांना खाऊवाटप, अन्नदान असे अनेक सामाजिक कामे केली आहेत. मंडळाच्या निर्भया महिला मंचच्या वतीनेही महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक कार्यक्रम घेण्यात आले आहेत. त्यामध्ये रहाटणी परिसरातील महिला व मुलींना विनाशुल्क ब्यूटी पार्लर, संगणक, शिवणकाम आणि पाककलेचे प्रशिक्षण दिले जाते. आतापर्यंत चार ते पाच हजार महिलांनी या प्रशिक्षण शिबिरांचा लाभ घेतला आहे. एवढेच नव्हे, रहाटणी प्रभागातील डास निर्मूलन करण्याच्या दृष्टीने मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने फॉगिंग मशिन खरेदी केले आहे. मंडळाचे कार्यकर्ते आवश्‍यक त्या ठिकाणी धुरीकरण करून डास निर्मूलनासाठी प्रयत्न करतात. त्या व्यतिरिक्तही रहाटणी आणि पिंपळे सौदागर परिसरात मंडळाचे अध्यक्ष कोकणे यांच्या वतीने ई-रिक्षा सुरू करण्यात आली आहे. 

स्त्री भ्रूण हत्या हा आपल्याकडील मोठा गंभीर विषय आहे. भारतामध्ये मुलींचा जन्मदर अत्यंत कमी आहे. त्यामुळे नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही नोव्हेंबर २०१६ मध्ये ‘मुलगी जन्माचे स्वागत’ हा उपक्रम हाती घेतला. त्याअंतर्गत ज्या कुटुंबात मुलगी जन्माला आली, त्यांना पाच हजार रुपये रक्कम भेट म्हणून दिली गेली. आतापर्यंत वीसहून अधिक मुलींचे आम्ही अशा प्रकारे स्वागत केले.
- उल्हास कोकणे, मंडळाचे अध्यक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Verdict : विवाहित महिला 'लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार' केल्याचा आरोप करु शकत नाही, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

'क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’च्या घवघवीत यशानंतर निर्मात्यांनी केली सिक्वेलची घोषणा ! झिम्मा ३ ही येणार

T20 World Cup 2026 : विश्वकप स्पर्धेच्या एक दिवस आधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! 'तो' लकी खेळाडू स्पर्धेतून बाहेर, कारण काय?

Mumbai Local: मुंबई लोकल प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! 'या' मार्गावरील सेवा तब्बल तीन महिने विस्कळीत राहणार; का आणि कोणत्या?

Latest Marathi News Live Update : इचलकरंजी महानगरपालिकेचा पहिला महापौर ठरला; उदय धातूंडे यांची निवड

SCROLL FOR NEXT