पुणे

बेशिस्त वाहनचालकाच्या तक्रारीवरून पोलिसाची बदली

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - बेशिस्त वाहनचालकावर कारवाई केल्याने वाहनचालकाने पोलिस आयुक्तांकडे खोटी तक्रार केली. त्या तक्रारीची दखल घेत कर्तव्यदक्ष पोलिसाची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आल्याचे समोर आले आहे. 

विकास आवटे असे या वाहतूक पोलिसाचे नाव असून ते निगडी वाहतूक शाखेत कार्यरत आहेत. त्यांनी वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या अतिश भालसिंग या वाहनचालकावर कारवाई करत दोनशे रुपयांचे ई-चलन केले. मात्र भालसिंग याने पोलिस आयुक्त रश्‍मी शुक्‍ला यांना व्हॉट्‌सऍप करून आवटे यांनी त्याच्याकडून पावती व्यतिरिक्त शंभर रुपये रोख घेतले, अशी तक्रार केली. तसेच थरमॅक्‍स चौक येथे महिला पोलिस हवालदाराने भालसिंग याचा मित्र शेट्टी याच्या काळ्या काचेच्या वाहनावर कारवाई केली. त्यावेळी शेट्टी याने कारवाईच्या निषेधार्थ पन्नास ते साठ जण जमवले. त्यावेळी आवटे कारवाईच्या ठिकाणी गेल्याचे समजल्याने या पोलिसांना धडा शिकवायचा या उद्देशाने भालसिंग याने यमुनानगर पोलिस चौकीत आवटे यांनी धमकावल्याची खोटी फिर्याद दिली. पोलिसांनी त्यावेळी आवटे यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला. तसेच भालसिंग याने आयुक्तांकडेही धमकावल्याची तक्रार केली. त्यामुळे आवटे यांची कोणतीही शहानिशा न करत वाहतूक नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली करण्यात आली. या प्रकरणामुळे पोलिसांत अस्वस्थता पसरली असून त्यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. 

बेशिस्त वाहनचालकाची गुन्हेगारी प्रार्श्‍वभूमी 
नारायण गव्हाणचे उपसरपंच (ता. पारनेर, जि. नगर) प्रकाश कांडेकर यांच्या (सीआर क्र. 82/2010) खून प्रकरणात भालसिंग याच्या सांगण्यावरून मयत कांडेकर यांच्या डोक्‍यातील गोळी गायब केल्याचे सिव्हिलमधील आरोपींनी कबूल केले होते. त्यावेळी त्याला अटक करून गोळी शोधण्यात आली होती. मात्र नंतर त्याची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. तर निगडी पोलिस ठाण्यात (सीआर क्र. 36/2009) त्याच्यासह साथीदारांविरोधात मोटार चोरीचा गुन्हा दाखल आहे. 

पोलिसांना ब्लॅकमेल करणाऱ्या टोळ्या सक्रिय 
पोलिसांबरोबर आर्थिक संबंध स्थापित करून तसेच पार्ट्यांमधून पोलिसांच्या संपर्कात राहून पोलिस व अधिकाऱ्यांचे अनेक कच्चे दुवे जाणून घ्यायचे. त्याचे पुरावे जमा करून त्यांनाच ब्लॅकमेल करणाऱ्या टोळ्या सध्या शहरात सक्रिय असल्याची धक्कादायक माहीत समोर आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shoumika Mahadik Gokul Election : गोकुळमध्ये धक्कादायक निकालाची शक्यता; शौमिका महाडिक यांचं काय होणार? राजू आवळे, सुजित मिणचेकर यांना समान मते

Ladki Bahin Yojana 2026 : लाडक्या बहिणींच्या खात्यात पुढच्या आठवड्यात जमा होणार 1500 रुपये? दिवाळीपूर्वी दोन महिन्यांचे 3000 रुपये मिळणार? महत्त्वाची अपडेट समोर...

ए, माझं बोलणं नीट ऐक... टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर बिश्नोई गँगची सलमान खानला उघड उघड धमकी; म्हणाले-

Latest Marathi News Live Update : मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नविद मुश्रीफ पिछाडीवर; समविचारी आघाडीचे शशिकांत खोत यांनी घेतली आघाडी

SMRITI MANDHANA SHAIFALI VERMA RECORD: स्मृती-शफालीच्या जोडीने रचला इतिहास; टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारी पहिलीच जोडी

SCROLL FOR NEXT