पिंपरी - येथील रेल्वे स्टेशनबाहेर श्री शितलादेवी रिक्षा स्टॅण्डवर क्रांती रिक्षा सेनेच्यावतीने मीटरप्रमाणे भाडे आकारणी उपक्रमास सुरवात झाली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष श्रीधर काळे, विश्‍वनाथ कुमार, प्रभाकर पवार, बबन जाधव यांच्यासह रिक्षा चालक उपस्थित होते. 
पुणे

शहरात मीटरप्रमाणे रिक्षाप्रवास

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - शहरातील प्रवाशांच्या मागणीनुसार रिक्षाचालक, रिक्षा संघटना यांनी मीटरप्रमाणे भाडे आकारण्याचे मान्य केले. महाराष्ट्र रिक्षा पंचायत, रिक्षा पंचायत, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (वाहतूक विभाग) आणि क्रांती रिक्षा सेना या संघटनांनी रिक्षाथांब्यांवर मीटरप्रमाणे रिक्षा चालविण्याबाबत सदस्यांना सूचना दिल्या; तसेच अंमलबजावणीही सुरू केली.

मंगळवारी (ता. १९) ‘सकाळ’मध्ये ‘रिक्षा प्रवास मीटरप्रमाणे’ या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध झाले. त्यानुसार पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे मंगळवारी मीटरप्रमाणे रिक्षा प्रवासास सुरवात करण्यात आली. महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे, रिक्षा पंचायतीचे शहराध्यक्ष अशोक मिर्गे, आत्माराम नाणेकर, काशिनाथ शेलार, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वाहतूक विभागाचे अध्यक्ष अजीज शेख यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या संघटनेच्या नेत्यांनी आपापल्या रिक्षाथांब्यावर रिक्षाचालकांना मीटरप्रमाणेच भाडेआकारणी करण्याची सूचना केली. मीटरप्रमाणे भाडेआकारणी न करणाऱ्या रिक्षाचालकांवर पोलिसांनी कारवाई केल्यास संघटना त्याला विरोध करणार नाही, अशी ग्वाहीदेखील या संघटनांनी दिली.

क्रांती रिक्षा सेनेच्या वतीने पिंपरी रेल्वे स्टेशनबाहेरील श्री शितलामाता ऑटो रिक्षा स्टॅण्ड येथेही मीटरप्रमाणे रिक्षा चालविण्याचा उपक्रमास सुरवात झाली. या वेळी संघटनेचे अध्यक्ष श्रीधर काळे, विश्‍वनाथ कुमार, रामभाऊ दंडवते, प्रभाकर पवार, सुधाकर गुडो, बबन जाधव आदी उपस्थित होते. या रिक्षा स्टॅण्डवर यापूर्वीच होकार रिक्षा म्हणून उपक्रम राबविण्यात येत आहे.

शहरात आजपर्यंत मीटरप्रमाणे प्रवास कधीच केला नव्हता. आज पहिल्यांदाच रिक्षाचालकाने मीटरप्रमाणे भाडे आकारणार असल्याचे सांगितले. यामुळे सुखद धक्‍का बसला.
- दिलीप जाधव, प्रवासी

आकुर्डीला जायचे असे सांगितल्यावर रिक्षाचालकाने मीटर डाउन केले. याबाबत त्यास विचारले असता आजपासून मीटरप्रमाणे भाडे आकारणार असल्याचे सांगितले.
- नदीम शेख, प्रवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

SCROLL FOR NEXT